मोहम्मद उमरने स्वत: कार चालवत आत्मघाती हल्ला केल्याचा संशय; नेमकं काय घडलं?, खळबळजनक माहिती समो
दिल्ली बॉम्बस्फोट बातम्या नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली काल (10 नोव्हेंबर) स्फोटाने (Delhi Bomb Blast) हादरली. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला (Delhi Red Fort Blast) मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळून जाणाऱ्या एका कारमध्ये (Delhi Car Blast) सोमवारी सायंकाळी 6.52 वाजता भयंकर स्फोट झाला. या स्फोटात 9 जण ठार व 24 जण जखमी झाले. स्फोटानंतर आग भडकली व परिसरातील अनेक वाहनांनी पेट घेतला. मेट्रो स्टेशनच्या गेट आणि आजूबाजूच्या काचाही फुटल्या.
दिल्लीतील स्फोटच्या घटनेनंतर संपूर्ण दिल्ली, मुंबईहरियाणा, उत्तर प्रदेशातील अयोध्या, काशीसह देशभरात अनेक ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा दहशतवादी हल्ला आहे की वाहनाच्या इंधनामुळे स्फोट (Delhi Bomb Blast) झाला, याचा सर्व बाजूंनी तपास करण्याचे आदेश गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिले आहेत. दरम्यान दिल्ली स्फोटप्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे.
#पाहा | दिल्ली: NSG टीम, एका स्निफर डॉगसह, दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील घटनास्थळी तपास करत आहे जिथे ह्युंदाई i20 कारमध्ये आज संध्याकाळी 7 वाजता स्फोट झाला.
या स्फोटामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. pic.twitter.com/HelSnpScwD
— ANI (@ANI) 10 नोव्हेंबर 2025
मोहम्मद उमराणे उमराणे उमराणे उमरणे आसा
दिल्ली स्फोट प्रकरणात दोन संशयितांची नावे समोर आली आहे. मोहम्मद उमर आणि तारिक अशी संशयितांची नावे असल्याची माहिती मिळत आहे. बॉम्बस्फोटांसाठी वापरलेली i-20 कार तारिकच्या नावावर होती. मोहम्मद उमरने कार चालवत नेऊन आत्मघाती हल्ला केल्याचा संशय समोर येत आहे. बॉम्बस्फोटात मोहम्मद उमरही ठार झाल्याचा अंदाज आहे. दिल्ली पोलिसांकडू युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच विविध ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.
बॉम्बस्फोटांसाठी वापरली i-20 कार- (Delhi Car Blast)
1. ह्युंदाई कंपनीची i-20 कार स्फोटांसाठी वापरली.
2. दिल्लीतला मोहम्मद सलमान कारचा मूळ मालक.
3. सलमाननं आपली कार ओखला भागातील नदीमला विकली.
4. नदीमने i-20 कार ‘रॉयल कार झोन’ या डीलरला विकली.
5. पुलवामाच्या तारीकने ‘रॉयल कार झोन’कडून i-20 कार घेतली.
6. तारीक मूळचा पुलवामाचा, पण फरीदाबादमध्ये राहत होता.
7. फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटके सापडलेला डॉ.मुझम्मील शकीलही पुलवामाचाच.
8. मुझम्मील शकीलच्या अटकेनंतर तारीकने घाबरुन आत्मघाती हल्ला केल्याचा संशय.
नेमकं काय घडलं? (Delhi Red Fort Blast)
1. दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशननजीकच्या सिग्नलजवळ कारमध्ये स्फोट
2. सोमवार 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.52 दरम्यान घटना घडली
3. स्फोट इतका भीषण की, साधारण 8 ते 10 कार आणि इतर वाहने जळून खाक
4. सायंकाळी 6.55 वाजता अग्निशमन दलाला स्फोटाची माहिती मिळाली
5. दिल्ली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल, नपासाला सुरुवात
6. लाल किल्ल्याभोवतीचा संपूर्ण परिसर, चांदणी चौक आणि रस्ते बंद
7. कारचा स्फोट कशामुळे झाला याबाबतचे अधिकृत कारण अद्याप अस्पष्ट
8. घटनेनंतर एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती
9. रात्री 10 पर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, देशभरात हायअलर्ट जारी
दिल्लीत कारमध्ये भीषण स्फोट, VIDEO:
संबंधित बातमी:
Delhi Blast : दिल्ली स्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात, घटनेच्या दोन तासाच्या आत पोलिसांची कारवाई
आणखी वाचा
Comments are closed.