राजधानीत समीर रिजवी नावाचं वादळ; मुंबईची ‘पलटन’ चारीमुंड्या चीत, दिल्ली टॉपवर; कर्णधार सूर्याने

IPL 2026 मध्ये समीर रिझवी DC ने MI चा 6 विकेट्सने पराभव केला : आयपीएल 2026 मधील आठवा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम येथे खेळला गेला आणि या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 6 विकेट्स गमावत 162 धावांचा आव्हानात्मक स्कोर उभा केला. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात डळमळीत झाली, मात्र त्यानंतर समीर रिजवीने जबरदस्त खेळी करत सामना पूर्णपणे फिरवला. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने 6 विकेट्सने सहज विजय मिळवला. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसरा विजय मिळवत गुणतालिकेत 4 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सला या पराभवामुळे मोठा धक्का बसला असून त्यांच्या स्थानात घसरण झाली आहे.

मुंबई इंडियन्सची धक्कादायक सुरुवात

नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन डावाची सुरुवात करण्यासाठी आले. तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 11 चेंडूंत 9 धावांवर असताना मुकेशने रिकेल्टनला बाद केले, तेव्हा संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर, त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर मुकेशने तिलक वर्माला शून्यावर बाद केले. संघाने 18 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या.

रोहित शर्माची 35 धावांची खेळी

यानंतर रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या साथीने डाव सावरला आणि संघाची धावसंख्या 18 वरून 71 धावांपर्यंत नेली. रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी 26 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकार मारत 35 धावांची खेळी केली. तो अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला.

सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले

सूर्यकुमार यादवने धमाकेदार खेळी करत अर्धशतक झळकावले. या सामन्यात सूर्याने 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 36 चेंडूंमध्ये 51 धावा केल्या. तो लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर पायचीत (LBW) झाला. सूर्यानंतर नमन धीर 28 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. संघाकडून मिचेल सँटनरने 18 धावा आणि कॉर्बिन बॉशने 11 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारने सर्वाधिक 2 बळी घेतले. तर लुंगी एनगिडी, विप्रज निगम, अक्षर पटेल आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

केएल राहुल पुन्हा फेल…

मुंबई इंडियन्सने दिलेल्या 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात केएल राहुल बाद झाला. दीपक चहरने त्याला फक्त 1 धावेवर माघारी धाडत मुंबईला पहिला मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्यानंतर दिल्लीला आणखी एक धक्का बसला, जेव्हा नीतीश राणा रनआऊट होऊन शून्यावर परतला. सुरुवातीच्या या दुहेरी धक्क्यामुळे दिल्लीची अवस्था संकटात सापडली होती.

पाथुम निसांकाने डाव सावरला, समीर रिजवीने विजयाचा पाया रचला

यानंतर पाथुम निसांका आणि समीर रिजवी यांनी डाव सावरला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 66 धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. निसांकाने आक्रमक खेळ करत 30 चेंडूत 44 धावा (6 चौकार, 1 षटकार) केल्या, मात्र मिचेल सँटनर याने त्याला बाद करून दिल्लीला तिसरा झटका दिला. दरम्यान, समीर रिजवीने पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्म दाखवत सलग दुसरे अर्धशतक ठोकले. कॉर्बिन बॉशने रिझवीला बाद केले, ज्याने 51 चेंडूंमध्ये सात चौकार आणि सात षटकारांसह 90 धावा केल्या होत्या. रिझवी आणि मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली आणि दिल्लीच्या विजयाचा पाया रचला.

हे ही वाचा –

Yuvraj Singh on Commentary : त्या लोकांमुळे मी कधीच कमेंट्री करणार नाही…; युवराज सिंगच्या एका वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ, मनातलं सगळं बोलून गेला

आणखी वाचा

Comments are closed.