दिल्लीत भाजपने ‘आप’चं नाक कापलं, अरविंद केजरीवाल अन् मनिष सिसोदियांना पराभवाचा धक्का

दिल्ली निवडणुकीचा निकाल 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे परवेश प्रवेश वर्मा (Parvesh Varma) यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर मात केली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला. याआधीच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. याशिवाय दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी या सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत.

जंगपुरा विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाने माजी उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया (manish sisodia) यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून तरविंदर सिंग मारवाह (Tarvinder Singh Marwah) आणि काँग्रेसकडून फरहाद सुरी निवडणूक रिंगणात उतरले होते.

केजरीवाल, मनीष सिसोदियांचा पराभव

मनीष सिसोदिया हे पहिल्यांदाच जंगपुरा येथून मैदानात उतरले होते. याआधी ते पटपडगंजमधून निवडणूक लढवत होते. यावेळी पक्षाने शिक्षणतज्ज्ञ अवध ओझा यांना पटपडगंजमधून उमेदवारी दिली होती. जंगपुरा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. या जागेवर भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी 1844 मतांनी विजय मिळवला आहे. तर अरविंद केजरीवाल यांचा देखील पराभव झालाय.

भाजपची वाटचाल बहुमताच्या दिशेने

दरम्यान, सध्याच्या कलानुसार भाजपने (BJP) दिल्लीत जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आये . आपचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या हातातून दिल्ली निसटल्याचे चिन्ह दिसत आहे. सध्या दिल्लीत भाजपची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. दिल्लीत भाजप 48, आप 22 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस एकाही जागेवर आघाडीवर नाही. त्यामुळे दिल्लीत आपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Anna Hazare On Arvind Kejriwal: दिल्लीत आम आदमी पार्टीला धक्का; अरविंद केजरीवालांच्या गुरुची मार्मिक प्रतिक्रिया, अण्णा हजारे म्हणाले….

Delhi Election Result 2025 : दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?

अधिक पाहा..

Comments are closed.