मालवीयनगर आगीच्या दुर्घटनेनंतर चिमुकल्याला घेऊन तिसऱ्या मजल्यावरून महिलेची उडी; पायाला फ्रॅक्चर

नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर येथील लेमन ग्रीन हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा होरपळून (Delhi Malviya Nagar Hotel Fire) मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण दिल्ली हादरली असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी (Delhi Malviya Nagar Hotel Fire) सांगितलेल्या माहितीमुळे या दुर्घटनेचे भयावह चित्र समोर आले आहे.(Delhi Malviya Nagar Hotel Fire)

Delhi Malviya Nagar Hotel Fire: काही जणांनी खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला

प्रत्यक्षदर्शी ओम यांनी सांगितले की, सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मित्रासोबत स्कूटरवरून जात असताना त्यांनी हॉटेलला भीषण आग लागल्याचे पाहिले. संपूर्ण इमारत आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली होती आणि जीव वाचवण्यासाठी लोक वरच्या मजल्यांवरून खाली उड्या मारत होते. काही जणांनी खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. “आम्ही चार ते पाच जणांना इमारतीवरून उड्या मारताना पाहिले. त्यातील एका व्यक्तीचा पाय पूर्णपणे मोडला होता,” असे त्यांनी सांगितले. आगीची तीव्रता वाढत असताना अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊ लागल्या. परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमा झाली. धूर, आगीच्या ज्वाळा आणि मदतीसाठी होणारी आरडाओरड यामुळे परिसरातील वातावरण अत्यंत भीषण झाले होते.(Delhi Malviya Nagar Hotel Fire)

Delhi Malviya Nagar Hotel Fire:  एक महिला आपल्या लहान मुलाला घेऊन तिसऱ्या मजल्यावरून…

दुसरे प्रत्यक्षदर्शी शेर खान यांनी सांगितले की, ते आपल्या दुकानाकडे जात असताना सुरुवातीला इमारतीत किरकोळ आग दिसत होती. मात्र काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्यासाठी कोणताही सुरक्षित मार्ग उपलब्ध नव्हता. त्यामुळे स्थानिक नागरिक मदतीसाठी पुढे सरसावले आणि इमारतीखाली रस्त्यावर गाद्या अंथरल्या, जेणेकरून उडी मारणाऱ्यांना कमी दुखापत होईल.

याच दरम्यान एक महिला आपल्या लहान मुलाला घेऊन तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारल्याचे त्यांनी सांगितले. या उडीत महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि तो फ्रॅक्चर झाला. “माझा पाय मोडला आहे,” असे ती महिला वारंवार सांगत होती. त्यानंतर आणखी अनेक जणांनी जीव वाचवण्यासाठी एकामागोमाग एक इमारतीवरून उड्या मारण्यास सुरुवात केली.या भीषण दुर्घटनेत अनेकांनी जीव गमावला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आग लागल्यानंतर हॉटेलमधील लोकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. बचावासाठी लोकांनी केलेले प्रयत्न आणि जीव वाचवण्यासाठी घेतलेली धाडसी पावले उचलली. दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू आहे.

Delhi Malviya Nagar Hotel Fire: मालवीय नगरमध्ये आग कशी लागली?

दिल्लीतील मालवीय नगर येथील रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत माहिती देताना मालवीय नगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यांच्या माहितीनुसार, आग प्रथम रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात लागली आणि त्यानंतर ती शेजारील हॉटेलच्या वरच्या मजल्यांपर्यंत वेगाने पसरली. आग आणि धुरामुळे अनेक जण प्रभावित झाले. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आपणही या बचाव मोहिमेत सहभागी असल्याचे भारती यांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना दिल्ली सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून आगीमागील नेमके कारण आणि जबाबदार घटकांचा शोध घेण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.