मुंबईतून दाऊद मॉड्यूलचा दहशतवादी हुफैझा आणि ISI एजंट शहजाद भट्टीला अटक; दिल्ली पोलीस आणि मुंबई ATS ची मोठी कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एक मोठी कारवाई करत मुंबईतून पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चा एजंट शहजाद भट्टी याच्यासह अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मॉड्यूलचा दुसरा दहशतवादी हुफैझा याला अटक केली आहे. दहशतवादी हुफैझा याच्या शोधात दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि मुंबई एटीएस गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत सातत्याने छापे टाकत होते. या कारवाईच्या एक दिवसापूर्वीच हुफैझाच्या शोधात मुंबईत ठिकठिकाणी शोधमोहीम सुरू असल्याचे वृत्त समोर आले होते.

अटक करण्यात आलेला हुफैझा हा मुंबईच्या गुन्हेगारी जगतात दाऊद इब्राहिमचा उजवा हात मानला जाणारा आयएसआय एजंट मुन्ना झिंगाडा याचा अत्यंत जवळचा सहकारी आहे. मुन्ना झिंगाडा हा सध्या कराचीमधून हुफैझा याला थेट सूचना देत होता आणि तो तिथून मिळणाऱ्या आदेशानुसार मुंबईत कारवाया करत होता. अखेर मुंबईतून मंगळवारी रात्री त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.

या आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यासाठी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून (आयबी) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गेल्या महिनाभरापासून दिल्ली, मुंबई, राजस्थान आणि पंजाबमध्ये छापे टाकले जात आहेत. या मोहिमेत स्पेशल सेलने आतापर्यंत चार वेगवेगळ्या राज्यांतून या मॉड्यूलशी संबंधित नऊ दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

Comments are closed.