दिल्लीचे निकाल येताच नायब राज्यपालांचे आदेश, मंत्रालयातून एकही कागद बाहेर जाता कामा नये

दिल्ली विधनसभा निवडणुकीचा निकालः दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. भाजपने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवलाय. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय. दिल्लीत भाजपने 27 वर्षांनी पुनरागमन केलंय. दरम्यान, दिल्लीचे निकाल हाती येताच नायब राज्यपालांकडून महत्वाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सचिवालयातून कोणताही कॉम्प्युटर हार्डवेअर आणि दस्ताऐवज बाहेर जाता कामा नये, अशी नोटीस नायब राज्यपालांकडून जारी करण्यात आली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास हाती आले आहेत. गेली दहा वर्षे दिल्लीच्या राजकारणात निर्विवाद वर्चस्व मिळवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागलाय. तर दुसरीकडे गेल्या दहा वर्षात सातत्याने पराभव स्वीकारव्या लागणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत मोठं यश मिळालं आहे. दिल्लीतील विधानसभेच्या 70 जागांसाठी नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज मतमोजणी करण्यात येत आहे. दरम्यान आपचा पराभव होताच नायब राज्यपालांकडून आदेश जारी करण्यात आलाय. दिल्लीतील सामान्य प्रशासन विभागाने एक आदेश जारी केलाय. यामध्ये सरकारी डेटा आणि सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन सचिवालय पूर्णपणे सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्लीत  भाजपला बहुमत, केजरीवालांना मोठा धक्का

दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. भाजपने 70 पैकी 48 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. त्यामुळे भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलंय. मात्र, दुसरीकडे आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा  आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. आपला या निवडणुकीत केवळ 22 जागा मिळाल्या असून काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Delhi Vidhansabha Election Result : दिल्लीचे निकाल येताच नायब राज्यपालांचे आदेश, मंत्रालयातून एकही कागद बाहेर जाता कामा नये

अधिक पाहा..

Comments are closed.