आरएसएसच्या बैठकीत लोकसंख्येच्या 'असंतुलन'वर चर्चा
बदलणाऱ्या आकड्यांनी वाढविली चिंता : आंध्रदेशात अखिल भारतीय समन्वय बैठक
वृत्तसंस्था/अमरावती
आंध्रप्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसांपर्यंत चाललेल्या ‘अखिल भारतीय समन्वय बैठकी’त लोकसंख्येचे असंतुलन आणि त्याच्या सामाजिक सद्भावावर पडणाऱ्या प्रभावावर चर्चा झाली आहे. संघ नेते मुकुंद यांनी शुक्रवारी बैठकीत झालेल्या चर्चांची माहिती देत काही भागांमध्ये वेगवेगळे वर्ग आणि समुदायांच्या लोकसंख्येत वेगाने बदलाचा मुद्दा प्रमुख विषयांमध्ये सामील राहिल्याचे सांगितले आहे. काही वर्ग किंवा समुदायांच्या लोकसंख्येत अत्यंत मोठी वाढ होत आहे. तर दुसरीकडे काही समुदायांच्या लोकसंख्येत घट दिसून येत आहे. बैठकीत लोकसंख्येतील अशाप्रकारचे बदल त्यामुळे निर्माण होणाऱ्या असंतुलनाला गंभीरपणे घेण्यात आल्याचे मुकुंद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
घट होत प्रजनन दर
देशात प्रजनन दर सातत्याने घटत आहे, याचबरोबर काही भागांमध्ये लोकसंख्येच्या असंतुलनाचा प्रभाव सामाजिक सौहार्द आणि परस्पर सद्भावावरही दिसून येत आहे. बैठकीत या विषयाला सामाजिक दृष्टीने महत्त्वपूर्ण मानत याच्या संभाव्य प्रभावांवर विचारविनिमय करण्यात आल्याचे संघ नेत्याकडून सांगण्यात आले.
जंतर-मंतर येथील निदर्शनांवर चर्चा
दिल्लीतील जंतर-मंतर येथे अलिकडेच झालेल्या निदर्शनांचा उल्लेख करत मुकुंद यांनी बैठकीत व्यवस्थेशी निगडित काही त्रुटींवर चर्चा करण्यात आल्याचे सांगितले आहे. या मुद्द्यांवरील तोडगा आणि व्यवस्था सुधारण्याच्या आवश्यकतेवर विचार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
युवांच्या चिंतांवर मंथन
तीन दिवसीय बैठकीत युवांशी निगडित मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आले. युवांच्या चिंता, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक पावले आणि देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानावरून विस्तृत चर्चा झाली. युवांची ऊर्जा आणि क्षमतांचा सकारात्मक पद्धतीने राष्ट्रउभारणीत कशाप्रकारे वापर केला जाऊ शकतो यावर बैठकीत विचार करण्यात आला.
Comments are closed.