शिफारस पत्रासाठी 50 हजार लाचेची मागणी, वाशिमच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपेंवर शिक्षकांचा आरोप
अमरावती बातम्या : एका शिफारस पत्रासाठी 50 हजार लाचेची मागणी केल्याचा आरोप वाशिमच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्यावर करण्यात आला आहे. हा आरोप शिक्षकांनी केला आहे. शिक्षणाधिकारी धुपे, भाजप नेत्या संगीता शिंदे आणि शिक्षकाच्या संवादाची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तुमची कंप्लेंट करते असे भाजप नेत्या संगिता शिंदे यांनी म्हटलं आहे. तर शिक्षणाधिकारी म्हणाल्या करा कंप्लेंट असं म्हटलं आहे. या चित्रफितीमुळे पुन्हा एकदा शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
नेमका प्रकार काय?
शालार्थ आयडीसाठी आवश्यक असणारे शिफारस पत्र माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी अडवून ठेवले आहे. यासाठी हे पत्र देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याचा आरोप शिक्षक भारत टोंचर यांनी शिक्षण अधिकारी मंगल धुपे यांच्यावर केला आहे. वाशिमचा माध्यमिक शिक्षण विभाग भ्रष्टाचाराचा कुरण झालं आहे. शिक्षकांच्या शुल्लक कारणासाठी शिक्षणाधिकारी मंगल धुपे पैशाची मागणी करत आहेत. शिक्षण विभागावर भाजप नेत्या संगीता शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत. शालार्थ आयडीसाठी आवश्यक असलेल्या शिफारस पत्रासाठी शिक्षणाधिकारी मंगल तुपे यांनी शिक्षक भारत टोंचर यांच्याकडून 50 हजार रुपयांची मागणी केली. ही मागणी पूर्ण केली नाही म्हणून त्यांचं काम चार महिन्यापासून प्रलंबित ठेवण्यात आलं आहे.
गटविकास अधिकाऱ्यासमोर विस्ताराधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा व्हिडिओ समोर
जालना जिल्ह्यात देखील अधिकाऱ्यानेच लाच घेतल्याची घटना घडली आहे. जाफराबाद येथे वित्त आयोगाअंतर्गत केलेल्या कामाची देयक मंजूर करण्यासाठी चक्क पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यासमोर विस्ताराधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. कार्यालयातच लाचखोरीचा हा व्हिडिओ समोर आल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान पैसे घेणाऱ्या बी ए चव्हाण यांचे जिल्हा परिषदेच्या सीईओनी निलंबन केलं आहे. जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील 15 व्या वित्त आयोगांतर्गत नाली बांधकाम आणि सभागृहातील फरशी बांधकाम केलेल्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यासमोरच विस्तार अधिकाऱ्यांनी पैसे स्वीकारले होते. पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ तीन दिवसापासून समाज मध्यवर्ती व्हायरल होत आहे, दरम्यान या व्हिडिओ ची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित विस्तार अधिकाऱ्यांचे निलंबनाचे आदेश काढले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! गटविकास अधिकाऱ्यासमोरच विस्तार अधिकाऱ्याने घेतली लाच, व्हिडिओ व्हायरल, CEO कडून निलंबन
आणखी वाचा
Comments are closed.