अमेरिकेत इतिहास घडला… ट्रम्प यांच्या दारूण पराभवापेक्षा नवनिर्वाचित सिनेटर ख्रिस पप्पास यांच्या विजयाची चर्चा, कारणही आहे खास

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. सिनेटमध्ये 100 पैकी 52 जागा जिंकत डेमोक्रेटिक पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवला आहे, तर रिपब्लिकन पक्षाला 41 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे प्रतिनिधीगृहात 435 पैकी 324 जागांचे निकाल हाती आले असून इथेही डेमोक्रेटिक पक्षाची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. डेमोक्रेटिक पक्षाला 202 जागा मिळाल्या असून बहुमतासाठी आणखी 16 जागांची गरज आहे, तर रिपब्लिकन पक्षाला 123 जागा मिळाल्या आहेत.

अमेरिकेच्या राजकारणात उलथापालथ होत असताना आणखी एक ऐतिहासिक घडामोड घडली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या ख्रिस पप्पास यांनी सिनेट निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे. या विजयासह अमेरिकेच्या सिनेटमध्ये प्रवेश करणारे ते पहिले समलैंगिक पुरूष (ओपनली गे) ठरले आहेत. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे माजी सिनेटर जॉन सुनुनू यांचा पराभव केला. त्यामुळे न्यू हॅम्पशायरमधील सिनेटची जागा डेमोक्रॅटिक पक्षाकडे कायम राहिली आहे.

Comments are closed.