देऊळ बंद-२ च्या टीझरचे अनावरण

दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या श्री स्वामी समर्थांच्या अवतार कार्यावर आधारित दिग्दर्शक प्रवीण तरडेनिर्मित ‘देऊळ बंद’ या मराठी चित्रपटास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘देऊळ बंद २’ या मराठी चित्रपटाच्या टीझरचा अनावरण सोहळा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पार पडला. चित्रपटाचे दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, निर्माते कैलाश वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी, जुईली वाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते ऑनस्क्रीन बटन दाबून टीझरचे अनावरण करण्यात आले. हा चित्रपट २१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मंदार महाराज पुजारी, श्रीशैल गवंडी, प्रा. शिवशरण अचलेर, कोरिओग्राफर नंदकुमार जाधव, कुणाल मांजरेकर, चैतन्य दळवी, प्रद्युम्न जोशी, अभियंता नवनाथ बनकर सुनील नाईकवडी, सागर गोंडाळ, रमेश शिंदे, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, सुनील पवार, ओंकार महाडीक, अविनाश क्षीरसागर आदींसह ‘देऊळ बंद २’ चित्रपट संपूर्ण टीमसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘श्री स्वामी समर्थांची व्यक्तिरेखा साकारणं हे माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. ‘देऊळ बंद २’ या चित्रपटात शेतकरी कुटुंबानं घेतलेली ‘देवाची परीक्षा’ या अद्भूत प्रसंगावर विषय हाताळण्यात आला आहे, जो स्वामिभक्तांना नक्कीच भावेल.’ मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेते.

प्रवीण तरडेसारख्या नास्तिक माणसाला स्वामींनी भक्तिमार्ग दाखवून त्यांचे जीवन व संसार उभा केला आहे. ‘देऊळ बंद’ या शिर्षकावर स्वामींच्या विविध भक्तिमार्गावर आपण भविष्यात एकूण ११ भाग प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला स्वामी यश देतीलच; त्यापैकी आता ‘देऊळ बंद २’ प्रदर्शित होत आहे.

– प्रवीण तरडे, दिग्दर्शक.

Comments are closed.