नव्या आंदोलनाची तारीख 16 मे रोजी जाहीर करणार – मनोज जरांगे पाटील

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘कोण अध्यक्ष, कोण एमडी यांना अधिकार सरकार देते. सरकारलाच काम होऊ द्यायचे नाही. सरकारला अध्यक्ष आणि एमडीला बदनाम करायचे आहे. हे डावपेच आपण ओळखले पाहिजेत’. त्यासाठी राज्यात खूप मोठे आंदोलन उभे करणार असून, त्याची तारीख १६ मे रोजी सांगणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आंतरवाली सराटी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

जरांगे म्हणाले की, कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. याला एकजूट हाच पर्याय आहे, तुम्ही या सरकारला किती मायेने आणि पोटतिडकीने सांगितले तरी महायुतीचे सरकार आपल्या डोळ्यातील अश्रू कधीच पुसणार नाही. त्यासाठी तुम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावाच लागेल, कट्टरतेने रस्त्यावर यावे लागेल. सरकारची किंवा राजकीय नेत्यांची दया-माया करून चालणार नाही. तरच न्याय पदरात मिळू शकतो असे ते म्हणाले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेतील लाभार्थ्यांना नियमितपणे कर्जाच्या व्याजाचा परतावा मिळत नाही. मंडळाविरोधात मराठा समाजातील तरुणांच्या तक्रारी वाढत आहेत. या महामंडळाचे व्यवस्थापक आणि अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यामधील वाद मराठा समाजाच्या तरुणांच्या मुळावर उठल्याची चर्चा होत आहे. पण याला सर्वस्वी सरकारच जबाबदार असते, असे ते म्हणाले.

Comments are closed.