देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदे एकमेकांच्या शेजारी का बसले नाहीत? मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्
मराठी & Devendra Fadnavis: भाजपकडून शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची फोडाफोडी सुरु असल्याच्या कारणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. शनिवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या दिव्यज फाऊंडेशनच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) परस्परांपासून अंतर राखून बसल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाले होते. एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच दिल्लीत भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांविषयी अमित शाह यांच्याकडे नाराजीचा सूर लावल्याची चर्चा होती. त्यानंतर शनिवारी मुंबईतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दिसून आलेल्या दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Maharashtra Politics News)
गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमात आसनव्यवस्थेमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकमेकांपासून दूर बसावे लागले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असणाऱ्या दोन खुर्च्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासाठी राखून ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक खुर्चीवर पाहुण्यांची नावेही लिहली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे हे कार्यक्रमस्थळी आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पाहून त्यांच्यापासून अंतर राखून बसले, यामध्ये तथ्य नाही. दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा दुरावा नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले.
‘दिव्यज फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘ग्लोबल पीस ऑनर्स – 26/11 च्या शूरवीरांचे आणि पहलगाम हल्ल्यातील पीडितांचे स्मरण’
कार्यक्रमातील आणखी काही क्षण.@Dev_Fadnavis @Divyajfound #महाराष्ट्र #देवेंद्रफडणवीस #२६११ हिरोज #पहलगाम pic.twitter.com/t5nJ8rgs48
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) 22 नोव्हेंबर 2025
Maharashtra Politics: मुंबईतील कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
मुंबईतील या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आधीच येऊन बसले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीवेळानंतर याठिकाणी आले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले आणि त्यांनी एकनाथ शिंदेंना नमस्कार केला. तसेच त्यांना हात धरुन बाजूच्या खुर्चीवर बसण्यास सांगितले. एकनाथ शिंदे यांनीही देवेंद्र फडणवीस आणि उपस्थितांना नमस्कार केला. पण त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या दोन खुर्च्या सोडल्या आणि बाजूला बसले. या दोन्ही नेत्यांमध्ये दोन खुर्च्यांचं अंतर होते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडिया आणि राजकीय वर्तुळात शिंदे-फडणवीस यांच्यातील नाराजीनाट्याची चर्चा रंगली होती.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.