आमचे कोणाशीही शत्रूत्व नाही, पण जे आमच्या बरोबर येणार नाहीत…; मुख्यमंत्र्याचे सूचक वक्तव्य

देवेंद्र फडणवीस बीएमसी निवडणूक निकाल 2026 : ‘आता निवडणूक संपली आहे, आमचे कोणीही शत्रू नाही, ते वैचारिक विरोधक आहेत. भाजपच्या मुंबई विकासाच्या कार्यक्रमाला पाठिंबा देणाऱ्यांना बरोबर घेवून पुढे जाऊ,’ असे सूचक वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. जे आमच्या बरोबर येणार नाहीत, त्यांच्याशिवाय पुढे जाऊ, पण मुंबई आता थांबणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला. तसेच मुंबई महानगरपालिकेवर (Mumbai Mahangarpalika) गेल्या 25 वर्षांपासून असलेली शिवसेना आणि ठाकरेंची सत्ता भाजप-शिंदे सेनेच्या युतीने उलथवून लावली. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मुंबईचा महापौर (Mumbai Mayor) कोण होणार, याची जोरदार चर्चा रंगली होती. अशातच आता महायुतीचाf आणि महापौर होईल, हे जवळ जवळ आता निश्चित झालं आहे.

Devendra Fadnavis: आमचे कोणीही शत्रू नाही, ते वैचारिक विरोधक

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 89 आणि शिंदे सेनेच 29 नगरसेवक निवडून आले होते. तर ठाकरे गटाचे 65 आणि मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी 114 नगरसेवकांची गरज आहे. हा आकडा गाठण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांची मदत घेणे अपरिहार्य आहे. अशातच, आता विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा देणाऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे भाजप अन्य पक्ष किंवा अपक्षांबरोबरही बेरजेचे राजकारण करण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मुंबईच्या महापौरपदाबाबत काय म्हणाले?

आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये कुणालाही मिळाल्या नाहीत. ‘वरच्या देवाने’च ठरवलं आहे, महायुतीचा महापौर करायचा. त्यामुळे मुंबईत महायुतीचाच महापौर होणार. शिंदे साहेब आणि आम्ही एकत्र बसून सगळं ठरवू आणि मुंबई चांगल्या पद्धतीने चालवू. मनसेला जास्त यश मिळेल असं मला आधीच वाटलं नव्हतं. दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीचा राज ठाकरे यांना फटका बसला आहे. तर उद्धव ठाकरे यांना त्याचा फायदा झाला आहे. निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नगरसेवक हे एका हॉटेलमध्ये ठेवले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही जसं आमच्या नगरसेवकांना एकत्र बोलावलं तसं शिंदेंनीही केलं असेल. आता आम्हाला पळवापळवीची गरज नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

फडणवीस यांनी भाजपच्या मुंबई महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांना दादर येथील कार्यालयात मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांनी पालिका प्रशासनाचा कारभार पारदर्शी पद्धतीने व लोकाभिमुख चालवून जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आवाहन नगरसेवकांना केले.

आणखी वाचा

मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

आणखी वाचा

Comments are closed.