काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म
देवेंद्र फडणवीस कन्या दिविजा फडणवीस CJP निषेध दिल्ली जंतरमंतरवर: गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरुन (NEET Exam Paper Leak) जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजून तरी यशस्वी चर्चा झाली नाही. तर काल रात्री जंतर मंतरवर काही काळ पुन्हा तणाव आणि गदारोळाचं वातावरण पाहायला मिळालं. समाजकंटकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती आहे. जमावाने अचानक दगड आणि बाटल्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. याचदरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची कन्या दिविजा फडणवीस (Divija Fadnavis) यांनी NEET पेपर फुटीवरुन सुरु असलेल्या आंदोलनावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
आंदोलनांबाबत भाष्य करण्यासाठी मला अनेकदा विचारणा करण्यात आली आहे, त्यावर मी इतकेच म्हणेन की, लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. आंदोलकांकडून पोलिसांवर होणारी हिंसा आणि पोलिसांकडून आंदोलकांवर होणारी हिंसा, या दोन्ही गोष्टींना परवानगी मिळता कामा नये, असं दिविजा फडणवीस म्हणाल्या. तसेच तुम्ही शैक्षणिक सुधारणांच्या मुद्द्याचे समर्थन करू शकता, परंतु त्या मुद्द्याचे नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षाचे आणि त्यांच्या विचारसरणीचे आंधळेपणाने समर्थन करू नका; त्या पक्षाचे खरे उद्देश काय आहेत, हे आधीच जाणून घ्या आणि त्याबाबत जागरूक राहा, असं आवाहन देखील दिविजा फडणवीस यांनी केलं.
सोशल मीडियावर गाजणाऱ्या कोणत्याही गोष्टीचे आंधळेपणाने समर्थन करू नका- दिविजा फडणवीस (Devendra Fadnavis Daughter Divija Fadnavis on CJP Protest)
लोकशाहीतील विरोधी पक्षाने देशाचे हित डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. केवळ सत्ताधारी पक्षाचा द्वेष करणे किंवा त्यांची बदनामी करणे याऐवजी, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी पक्षाला चांगले निर्णय घेण्यास मदत केली पाहिजे.
सोशल मीडियावर गाजणाऱ्या कोणत्याही गोष्टीचे आंधळेपणाने समर्थन करू नका, केवळ ‘ट्रेंड’ आहे म्हणून बंड करू नका आणि कोणत्याही विचारसरणीच्या आहारी जाऊन स्वतःची विचारशक्ती गमावू नका (ब्रेनवॉश होऊ देऊ नका). जोपर्यंत विद्यार्थ्यांचे हित जपले जाते, तोपर्यंत ते योग्य आहे; परंतु ज्या क्षणी ही निदर्शने धर्माच्या मुद्द्याकडे वळतात किंवा ‘नीट’ (NEET), पेपरफुटी व ‘एनटीए’ (NTA) यांच्या मूळ विषयापासून भरकटतात, तेव्हा त्यामागचा उद्देश बदलतो, याबद्दल सावध राहा, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस म्हणाल्या.
सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजूनही चर्चा नाही- (CJP Protest Delhi Jantar Mantar)
दिल्लीतील जंतरमंतरवरील काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची, गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरुन जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजून तरी चर्चा झाली नाही. तर विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आंदोलनाची कोंडी कधी फुटते हे पाहावं लागेल.
संबंधित बातमी:
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Comments are closed.