राज ठाकरे म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांची चोरी झालेय’, देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली
देवेंद्र फड्नाविस आणि राज ठाकरे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवेल. एखादा नेता मला भेटला यावरुन राजकार होत नसते, असे वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरे हे महायुतीसोबत राहतील, याबाबतच्या उरल्यासुरल्या आशा संपवून टाकल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी उभय नेत्यांमध्ये तब्बल पाऊणतास चर्चा झाली होती. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव झाल्यानंतर भाजप नेत्यांनी एकट्या उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे आपल्यासोबत येतील, याबाबत भाजप नेत्यांना अजूनही आशा आहे, असे बोलले जात होते. त्यामुळे भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य करणे टाळले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाली म्हणून राजकीय समीकरणं बदलत नाहीत, असे सांगत युतीच्या शक्यतेचे सर्व दोर कापून टाकले आहेत.
लोकांनी भ्रमित होण्याचे कारण नाही. आमची महायुती अभेद्य आहे. आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत. आम्हाला कोण येऊन भेटतो यावरुन युती ठरत नाही किंवा त्यावरुन राजकारणही होत नसते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढेल आणि महायुतीच जिंकेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांची चोरी झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी शनिवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला होता. याविषयी देवेंद्र फडणवीसांना विचारताच त्यांनी या दाव्याची खिल्ली उडवली. त्यांनी म्हटले की, मला एक गालिबचा शेर आठवतो. गालिबने म्हटले होते की, ‘दिल बहलाने के लिये ख्याल अच्छा है…’ मी यावर एवढेच बोलेन. जोवर सत्य स्वीकारणार नाही, तोवर सर्व पक्षांची अवस्था अशीच राहील. 2014 मध्ये मोदी जिंकले तेव्हा देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती. 15 – 15 वर्षांपासून सत्ता होती. जोवर विरोधक विचार करणार नाही की आपण का हरतो आहे, जनतेने आपल्याला का नाकारले आहे, याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचा काम करतील, तोवर हे जिंकणार नाहीत. विरोधक लोकांचा अपमान करतील तोपर्यंत निवडून येणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरुन यश मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनतील तब्बल 26 लाभ लाभार्थी बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, आमची चौकशी सुरु आहे. जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी आहेत त्यांचा लाभ बंद केला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
https://www.youtube.com/watch?v=tzo9j98lpqk
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.