देवेंद्र फडणवीसांकडून भाजप कार्यशाळेस अनुपस्थित राहिलेल्या आमदारांना सज्जड दम; म्हणाले….

देवेंद्र फड्नाविस: मुंबई येथील भाजप संघटन पर्व प्रदेश कार्यशाळेत भाजपचे काही आमदार गैरहजर राहिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर कार्यक्रमात अनुपस्थित असलेल्या आमदारांना सज्जड दम दिला आहे. काही लोकांनी सुट्टी घेतली आहे तर काहींनी न कळवताच अनुपस्थित राहिले आहेत. त्यातले काही मला मंत्रालयात भेटलेत मात्र कार्यशाळेत अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्यांना मी विचारतो ते कार्यशाळेत अनुपस्थित आहेत? सरतेशेवटी जे काम करतात त्यांना आपण जाब विचारतो जे गायब असतात त्यांना आपण विचारत नाही. त्यामुळे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांनी विचारणा करावी, असे म्हणत कार्यशाळेत अनुपस्थित राहिलेल्या आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadnavis) चांगलीच खरटपट्टी घेण्यात आली आहे.  शिवाय या आमदारांना स्पष्टीकरणही देण्याच्या सूचना केल्या आहेत.

आगामी दिवसात 1 कोटी भाजप सदस्यांच्या आकडा ही पार करु- देवेंद्र फडणवीस

भाजप हा एकमेव पक्ष आहे जो प्रामाणिकपणे संघटन पर्व राबवतो. लोकशाही पद्धतीनं पक्षाची रचना उभी करावी लागते. तसेच लोकतांत्रिक पद्धतीनं पक्ष उभा करणारा पक्ष म्हणजे भाजप हा आहे. प्राथमिक सदस्यतातून ही सुरुवात आपण करतो. केंद्रीय भाजपला विनंती केली होती आपल्याला सूट द्यावी कारण आपल्याकडे निवडणुका होत्या. त्यामुळे आपल्याला चांगला वेळ मिळाला आहे. आज आपण दीड कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. अमित शाह अध्यक्ष झाल्यानंतर जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपला बनवायचं आहे, असे त्यांनी सांगितलंय. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला देखील आपण मागे टाकले आहे आणि जवळ जवळ 11 कोटी सदस्य भाजपने बनवले होते. तर आज भाजपने आपलाच रेकॉर्ड मोडत 13 कोटी पेक्षा जास्त सदस्य भाजपने केले आहेत. तर  आगामी दिवसात 1 कोटींचा आकडा ही पार करु, असा विश्वास ही मुख्यमंमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून यावेळी व्यक्त करण्यात आला,

ज्या जिल्हात भाजपचा पालकमंत्री नाही, तिथे संपर्कमंत्री- देवेंद्र फडणवीस

दरम्यान, आपल्याकडे खोटी मेंबरशिप करता येत नाही. प्रत्येकी 1 हजारचा आकडा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट काहींनी पूर्ण केले आहेत. मात्र, काही मतदारसंघ मागे आहेत. थोडं लक्ष घातलं तर भाजपची यंत्रणा तशी आहे की ती 50 हजार एका विधानसभा मतदारसंघातून सदस्य येतील. आपली मोठी ताकद आहे. 10- 12 दिवसात 5 लाख सदस्य बनवावे लागतील.येत्या 15 तारखेपर्यंत हा टप्पा निश्चित आपण पार पाडू. मात्र ज्या राज्यांनी 1 कोटींचा आकडा पार केला त्यानंतर शिथिलता आली, मात्र आपण ती येऊ द्यायची नाही. भाजपच्या संविधानाला अपेक्षित आहे तसं काम आपण करु.

पेपरवर असणारा आपला पक्ष राहणार नाही. प्रत्येक व्यक्ती सक्रिय सदस्य असला पाहिजे. ज्या जिल्हात आपल्याला पालकमंत्री देता आले नाही तिथे संपर्कमंत्री आपण दिले आहेत. आपले काही म्हणणं असेल, जनतेचे काही विषय असतील, तर मग त्या माध्यमातून ते सोडवता येतील आपण अतिशय गतीशिलतेनं काम सुरु केलंय.जनतेचा अपेक्षित बदल आपल्याला दाखवायचा आहे. असे आवहन करत मुख्यमंमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.