इकडे सुरेश धसांच्या ड्रीम प्रोजेक्टचं लोकार्पण, तिकडे धनुभाऊंच्या काळात झालेल्या कामांची चौकशी

बीड: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत. खुंटेफळ तलावामुळे 30 गावांतील तब्बल 80  हजार एकर ओलिताखाली येणार आहे. 2800 कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले जाते.

दुष्काळाची झळ सोसणाऱ्या आष्टी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जीवनात आज हरितक्रांतीची पहाट उगवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज आमदार सुरेश धस यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या खुंटेफळ साठवण प्रकल्प योजनेच्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन बोगदा कामाचा शुभारंभ होणार आहे. या प्रकल्पामुळे आष्टी परिसरातील 30 गावांतील 25 हजार 543 हेक्टर क्षेत्र म्हणजे 80 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

तिसऱ्या वेळी आमदार असताना आमदार सुरेश धस यांनी 500 एमसीएफटी पाणी कुकडी प्रकल्पातून मेहेकरीच्या प्रकल्पात आणण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे हे काम मार्गी लागले होते. 2005 पासून आमदार धस हे उजनी धरणातील अतिरिक्त पाणी बोगद्याच्या माध्यमातून पाइपलाइनने खुटेफळ साठवण तलावात आणण्यासाठी त्यांचा संकल्प होता. यासंदर्भात बोलताना सुरेश धस यांनी म्हटले की, राज्याचे मुख्यमंत्रिपद तिसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच आष्टी मतदारसंघात जाहीर कार्यक्रमासाठी येत असून आमच्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे. प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्त भागात निश्चितच हरितक्रांती घडेल, अशा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केला.

ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी सर्व व्यापारी व शेतकरी कार्यक्रमासाठी रवाना

आष्टी तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी आष्टी तालुका शिरूर, पाटोदा येथे व्यापाऱ्यांकडून उत्स्फुर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. खुंटेफळ साठवण तलावाचे भूमिपूजन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजाताई मुंडे व या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. हा ऐतिहासिक आनंदाचा क्षण पाहण्यासाठी आष्टी येथील  व्यापारी व व्यावसायिकांनी उत्स्फुर्त बंद ठेऊन कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

धनंजय मुंडेंच्या काळात झालेल्या कामांच्या चौकशीला सुरुवात

बीड जिल्हा नियोजन समितीच्या कामाची त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी सुरू आहे. यासाठी चौकशी समिती सलग दुसऱ्या दिवशी बीडमध्ये ठाण मांडून आहे. दुसऱ्या दिवशी चौकशी समिती बीडमध्ये ठाण मांडून आहे. जिल्ह्यात 2023 ते 25 या दरम्यान झालेल्या जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी तात्काळ त्रीसदस्य समिती नेमली असून या समितीने प्रशासकीय मान्यतेचे कागदपत्र ताब्यात घेतले आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीमार्फत ही काम झाली होती. याच कामाची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून चौकशी समिती कडून ही चौकशी सुरू आहे.

https://www.youtube.com/watch?v=rapopwnmswa

आणखी वाचा

Beed: विष्णू चाटेचा मोबाईल गायब करण्याचं षडयंत्र, धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप, म्हणाले ‘पुरावा नष्ट झाला तर प्रशासन जबाबदारी…’

अधिक पाहा..

Comments are closed.