लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडव
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण न करणे, निकषांची पूर्तता न करणे आणि अर्जातील त्रुटी ही यामागील प्रमुख कारणे आहे. अपात्र ठरलेल्या महिलांचे या योजनेंतर्गत मिळणारे 1500 रुपये बंद झाले आहेत. 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पत्रकार परिषद घेत लाडकी बहीण योजनेवर मोठं विधान केलं आहे. (Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजना सुरु केली तेव्हा काही निकष होते. त्याद्वारे आपण पूर्तता केली होती आणि बहीणींना लाभ दिला होता. अर्थातच सरकारी पैसा खर्च करतो तेव्हा सीएजी ऑडिट होतं. योजना सुरु झाल्यावर आपण केवायसी सुरु केलं. सरकारी कर्मचारी आहेत, त्यासंदर्भात माहिती घेतली. परिवहन विभाग आहे, चारचाकी डेटाबेसची माहिती घेतली आणि त्यानंतर आपल्या लक्षात आलं, की 5 लाख असे आहेत ज्यात चारचाकी आहे. 14 हजार पुरुष निघालेत. अडीच लाख रुपयांपैक्षा उत्पन्न अधिक आहे, असे पण काहीजण निघाले. केवायसी करून घ्या सांगितलं, मात्र ती झाली नाही. त्यामुळे अपात्रांची संख्या 80 लाखांवर गेली, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. (Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana)
पुरुषांकडून पैसे वसूल करणार- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana)
ज्यांना अर्ज करता येतं त्यांना कागदपत्र केवायसी करता न येणे हे मान्य नाही. कुठला एक निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. योजना पात्रतेचे निकष पूर्ण करताना दिसत नाही. 1 कोटी 70 लाख महिला निकष पूर्ण करतात त्यांना पैसे मिळत राहतील. केवायसी न केलेल्या त्यांना पैसे देणार नाही. मात्र बहीणींकडून पैसे पुन्हा पण घेणार नाही. लाडकी बहीणींचे पैसे घेणारे 14 हजार पुरुष निघालेत. या पुरुषांकडून फसवणूक करुन घेतलेले सर्व पैसे वसूल करणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच लाडकी बहीण केवायसी करणार असेल तर आम्ही पुन्हा विंडो ओपन करायला तयार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana)
राज्यातील कुठल्याही पात्र लाडक्या बहिणीला योजनेतून वगळलेलं नाही. डेटाबेसनुसार आणि निकषात न बसणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या निकषात बसत नाही आणि ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्या 80 लाख लाडक्या बहिणींना यामध्ये वगळण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. अलीकडे केलेल्या तपासणीत चार ते पाच लाख लाभार्थी असे निघाले ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे. अजूनही काही महिलांना वाटत असेल की, त्या पात्र असून त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यासाठी पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली, तेव्हा या योजनेचे निकष होते. उत्पन्नाचे निकष होते. वयाचे निकष होते, शासकीय नोकरी असेल तर योजनेचा फायदा घेता येणार नाही. चारचाकी गाडी असेल तर योजनेत सहभागी होता येणार नाही, असे अनेक निकष होते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लाडरी बहीण योजनेवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.