समृद्धी महामार्गावर अचानक भेटले, सत्तार-दानवेंची गळाभेट, विधानपरिषद निवडणुकीचं राजकारण बदलणार?

Abdul Sattar and Ambadas Danve meet: आगामी विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार आणि बंडखोरीला ऊत आला असताना आता छत्रपती संभाजीनगरमधील एका घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांनी कालच भाजपकडून शिवसेनेचे (Shivsena) खच्चीकरण सुरु असल्याच्या आशयाचे विधान केले होते. तसेच त्यांनी दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र यायला हव्यात, असेही म्हटले होते. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी ही साद घातल्यानंतर ठाकरे गटाचे विधानपरिषद आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. ‘मला पण दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, असे वाटते. पण फक्त माझ्या एकट्याच्या मनात असून काय होणार?’, अशी सूचक हतबलता दानवे यांनी बोलून दाखवली होती. त्यानंतर दोन्ही शिवसेनेत हालचाली सुरु झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता आणखी एक महत्त्वाची घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे यांची भेट झाली. (Maharashtra Politics News)

अब्दुल सत्तार यांनी कालच भाजपवर टीका करत त्यांच्याकडून शिवसेना हळूहळू संपवली जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मंगळवारी अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे यांची गळाभेट झाली. अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी समृद्धी महामार्गाने मुंबईला जात होते. त्याचवेळी अंबादास दानवे हेदेखील शिर्डीला जात होते. समृद्धी महामार्गावर एके ठिकाणी या दोघांच्या गाड्यांचा ताफा आमनेसामने आला. यावेळी दानवे आणि सत्तार यांनी गाडीतून उतरुन एकमेकांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांची गळाभेट झाली. त्यांच्या या भेटीचे फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहेत. छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने अब्दुल सत्तार यांच्या मुलाने महायुतीत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर अब्दुल सत्तार यांना आपल्या मूळ पक्षाची आठवण झाली होती. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली होती. यानिमित्ताने दोन्ही शिवसेनेत टोमणे-प्रतिटोमण्यांचा का होईना, संवाद सुरु झाला होता. मात्र, आता अंबादास दानवे यांनी अब्दुल सत्तार यांची गळाभेट घेतल्याने छत्रपती संभाजीनगरच्या विधानपरिषद निवडणुकीत काही वेगळे राजकारण पाहायला मिळणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट अब्दुल सत्तार यांच्या मुलाला पाठिंबा देऊन भाजप आणि महायुतीला धक्का देणार का, हे पाहावे लागेल.

आणखी वाचा

Vidhan Parishad Election 2026 Abdul Sattar: काल भाजपविरोधात मनात साचलेली खदखद बोलून दाखवली, एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तारांना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं, विधानपरिषदेतील बंडखोरीबाबत चर्चेची शक्यता

आणखी वाचा

Comments are closed.