सरकारला ‘भिकारी’म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटेंचे मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले कान; म्हणाले…
मॅनक्राव कोकेटे वर देवेंद्रडना फॅव्हिस: हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही. पण, आम्ही शेतकऱ्यांना एका रुपयामध्ये पिक विमा दिला. काही लोकांनी त्याचा गैरवापर केला, असे वक्तव्य काही महिन्यांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली होती. आता माणिकराव कोकाटे यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना ‘शासन भिकारी आहे, शेतकरी नाही’, असे वक्तव्य केले आहे. यावरून माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आता माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते काय बोलले हे मी ऐकलेले नाही. मला असे वाटते की, जर त्यांनी असे वक्तव्य केले असेल तर मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे, अतिशय चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले आहेत. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पीक विमा संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धत बदलली. कारण आपल्या लक्षात आलं की, पिक विमामध्ये काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना जरी फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्यांनी घेतला आहे. त्यामुळे त्याची पद्धती बदलली. ती पद्धती बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा घेतला की शेतकऱ्यांना मदत तर करूच पण त्यासोबत पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू. त्याची आपण यावर्षीपासून सुरुवात देखील केली आहे. पाच वर्षात 25 हजार कोटी रुपये शेतीतील गुंतवणूक आपण वाढवत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य काही योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेते. शेतकऱ्यांना एक रुपया आम्ही देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे? शासन आहे, शेतकरी नाही. पण, त्याचा अर्थ उलटा केला. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि त्या पिक विम्यामुळे महाराष्ट्रात पाच ते साडेपाच लाख बोगस अर्ज साडे अर्ज सापडले. माझ्याच काळात सापडले आहेत. मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या. आतापर्यंत कमीत कमी 52 जीआर निघाले, इतक्या घोषणा मी केलेल्या आहेत. पुढील सहा महिन्यात मोठा बदल कृषी विभागात आपल्याला बघायला मिळेल. शंभर दिवसाच्या कार्यक्रमात तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आलेला आहे, असा नंबर आपोआप येतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
https://www.youtube.com/watch?v=YS5WKL3IXHU
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.