सातारा ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंची पाठराखण, म्हणाले, ‘मी पोलिसांचं अभि
सातारा ड्रग्ज प्रकरणावर देवेंद्र फडणवीस साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरात असणाऱ्या सावरी गावात काही दिवसांपूर्वी 145 कोटींचा ड्रग्जचा साठा सापडला होता. ड्रग्ज सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला होता. त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली. याप्रकरणात विरोधक एकनाथ शिंदे यांचे नाव जाणीवपूर्वक गोवत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Satara Drugs Case)
साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून ड्रग्जचा इतका मोठा साठा जप्त केला, त्यासाठी मी सर्वप्रथम पोलीस दलाचे अभिनंदन करतो. जो धंदा चालला होता, त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंचं नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, अयोग्य आहे, निषेर्धाह आहे. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यात एकनाथ शिंदे यांच्या परिवाराचा संबंध दुरावन्याने आढळून आलेला नाही. आम्ही याप्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भातही मोघम भाष्य केले. माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी आता अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. यापलीकडे देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्या आमदारकीचा राजीनामा, अटक वॉरंट याबद्दल कोणतीही टिप्पणी केली नाही.
Sushma Andhare: मुख्यमंत्र्यांनी स्वत: न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करु नये, सुषमा अंधारेंचा पलटवार
माननीय मुख्यमंत्र्यांची तळमळ मी समजू शकते, त्यांनी असा खोटा कळवळा दाखवू नये. त्यांना एकनाथ शिंदे यांच्याविषयी किती कळवळा आहे, त्यांना संपवण्यासाठी ते काय प्रयत्न करत आहेत, हे सांगायला त्यांनी मला भाग पाडू नये. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांना संविधानाचा आदर आहे की नाही, हे सांगावे. संविधानाने न्यायव्यवस्था दिली आहे, कोण बरोबर कोण चूक हे ठरवण्याचे अधिकार त्यांच्या ठायी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करु नये. तुम्ही न्यायाधीश असाल तर सगळी न्यायालयं बंद करा आणि तुमच्या कार्यालयाबाहेर पाटी लावून ठेवा, इथे क्लीन चिट मिळतील. एकनाथ शिंदेंचा याप्रकरणात संबंध आहे, असे माझे म्हणणे नाही. मी प्रकाश शिंदे यांच्याबद्दल बोलते. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असण्याचा फायदा प्रकाश शिंदेंना होऊ शकतो. प्रकाश शिंदे तपास प्रभावित करु शकतात. त्यामुळे काही काळ एकनाथ शिंदे यांनी पदापासून लांब राहावे, ही माझी मागणी आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.