बोलबच्चनांना मी उत्तर देत नाही; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. जर तुम्ही शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड तुम्ही पुसून टाकणार असाल तर महाराष्ट्राच्या धरतीवरुन तुमचं नाव पुसून टाकणार आहोत. भाजपचं नामोनिशाण पुसून टाकू, असा इशारा त्यांनी भाजपला दिला. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शुक्रवारी (दि. 20) जळगाव दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचा ब्रँड संपवायला आले तर तुमचे नामोनिशान पुसून टाकू, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बोलबच्चनांना मी उत्तर देत नाही, असे त्यांनी म्हटले.

बोलबच्चनांना मी उत्तर देत नाही

जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून मालकाचे नोकर भेटीगाठी घेतात, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी मनसे-शिवसेना युतीबाबत केले. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पुन्हा एकदा सांगतो, बोलबच्चनांना मी उत्तर देत नाही. हे बोलबच्चन आहेत. त्यांना मी उत्तर देत नाही, असे त्यांनी म्हटले.

खडसेंच्या भेटीबाबत मला माहिती नाही

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर आले. त्यामुळे आज एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खडसेंच्या भेटीबाबत मला माहिती नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

खाज्याजी नाईक यांचा स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक, हिंदू गोर बंजारा आणि लबाना समाज कुंभ प्रेरणा स्थळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावला दाखल झाले आहेत. याबात विचारले असता ते म्हणाले की,  आमच्या आदिवासी स्वातंत्र्य संग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे. या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. या ठिकाणी खाज्याजी नाईक यांनी अक्षरशः इंग्रजांना सळी की पळो करून सोडले आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा प्रचंड मोठा सहभाग होता. मागच्या काळात मी याच स्मारकाच्या भूमीपूजनासाठी आलो होतो. आता त्याच्या उद्घाटनाकरीता येण्याची संधी मला मिळाली. मला त्याचा आनंद आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Uddhav Thackeray : हिंदी सक्ती खपवून घेणार नाही, ठाकरे ब्रँड संपवू पाहणाऱ्यांचा नामोनिशाण मिटवू; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे

आणखी वाचा

Comments are closed.