आम्ही माणूस आहोत, कुठे चुकलो तर साधू संतांनी आम्हाला सांगा, तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे; नाशि
देवेंद्र फडणवीस : सिंहस्थासाठी (Kumbh Mela 2027) निधी कमी पडू नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही कटीबद्ध आहेत. सध्या सुमारे 6 हजार कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ झाला असून, 20 हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सिंहस्थ सुरू होईपर्यंत एकूण 25 हजार कोटींची कामे पूर्णत्वास जातील, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. तर आम्ही माणूस आहोत. आम्ही कुठे चुकलो तर साधू संतांनी आम्हाला सांगा. तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे. चूक झाली तर आम्ही पुन्हा ती सुधारू, असे आवाहन त्यांनी साधू संतांना केले आहे. नाशिक (Nashik News) येथे कुंभमेळ्याच्या कामांच्या शुभारंभ सोहळ्यातून ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 75 वर्षानंतर त्रिखंड योग असल्याने यंदाचा कुंभ विशेष आहे. दीर्घकाळ हा कुंभ चालणार आहे. प्रयागराजला कुंभमेळा झाला. त्यात जगातील सर्वात मोठा आस्थेचा कुंभ भरला होता. याच परंपरेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ आहे. गोदावरीत स्नान करण्यासाठी भाविक येत असतात. प्रयागराजला 15 हजार हेक्टर जागा आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला एकत्रित 500 एकर जागा आहे. त्यामुळे कमी जागेत कुंभ भरावावा लागतो. मागील कुंभ ही यशस्वी कुंभमेळा पार पडला. यावेळी 5 पट जास्त भाविक येणार आहेत. भाविकांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
Devendra Fadnavis: नाशिकमध्ये 25 हजार कोटींची विकासकामे
आमचे साधू महंत कुंभ चालवतात. आम्ही व्यवस्था देतो. नाशिकमध्ये 20 हजार कोटींची कामे हाती घेतली आहेत. ती 25 हजार कोटी रुपयांची होतील. 6 हजार कोटींची कामे सुरू झाले आहेत. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समन्वय राखून काम केल्याने मोठे काम होत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या लोकांची मदत होत आहे. काही लोकांना विस्थापित व्हावे लागते. त्याला लोक तयार झाले. मी, एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी सांगितले आहे की, निधीची कमतरता भासू देणार नाही. 12 वर्षानी कुंभ येतो, त्यामुळे आम्ही काम करत आहोत. गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे. गोदावरी निर्मळ झाली पाहिजे. इथे घाट बांधत आहोत. जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करत आहोत. हे काम करत असताना त्याची जुनी ओळख जाणार नाही याची काळजी घेत आहोत. रामायण काळात राम आणि सीता सर्वाधिक वेळ इथे राहिले आहेत. इथे अंजनेरीचा पर्वत आहे. ज्योतिर्लिंग इथे आहे, त्यामुळे पुढील 25 वर्षांचा विकास लक्षात घेऊन कामे करत आहोत. त्र्यंबकेश्वरला निवडणूक आहे. त्यामुळे मी त्र्यंबकेश्वर बाबतीत बोलत नाही, नाहीतर जिल्हाधिकारी माझा माईक बंद करतील. तो अधिकार त्यांना आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंदर फादरविस: चुकून चुकले तर सांगू
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, दोन रिंग रोड आपण तयार करतोय. त्यामुळे नाशिकला त्याचा फायदा होणार आहे. इथले एअर पोर्ट, रेल्वे स्टेशन, बस स्थानकचे काम करतोय. एआयचा वापर करून सीसीटीव्ही लावत आहोत. आधुनिक नाशिक तयार करत आहोत. 1200 एकर जागेत कुंभमेळ्यासाठी काम करत आहोत. त्यामुळे भविष्यात अडचण होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. आम्हाला सर्वांचे सहकार्य पाहिजे, कोणाचे नुकसान होणार नाही, त्याकडं आम्ही लक्ष देत आहोत. कुंभमेळ्याची सर्व कामे पारदर्शी होतील. कोणालाही फेव्हर होणार नाही. कोणाला अडचण होऊ देणार नाही. टेंडरमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. ती कामे अधिकाऱ्यांवर सोडा. आम्ही माणूस आहोत. आम्ही कुठे चुकलो तर साधू संतांनी आम्हाला सांगा. तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे. चूक झाली तर आम्ही पुन्हा ती सुधारू, असे आवाहन त्यांनी केले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.