Video: आम्ही मुंडेंसाहेबांनाच मुख्यमंत्री करणार होतो,पण.; CM फडणवीसांनी सांगितला 2014 चा किस्सा
लातूर : माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडवले ते आपल्या सर्वाचे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे (Gopinath munde) साहेबांच्या पावनस्मृतींना अभिवादन करतो. मी माझे भाग्य समजतो की, येथील पुतळा अनावरण सोहळा माझ्या हस्ते झाला. विलासराव देशमुख यांचा पुतळा त्याच ठिकाणी आहे, स्व गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांची मैत्री संपूर्ण राज्याला माहिती आहे. आज त्यांचे पुतळे एकमेकांच्या आजुबाजूस आहेत, हे वेगळेपण आहे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडनाविस (देवेंद्र फडनाविस) यांनी लातूरमधील (Latur) पुतळा अनावरण सोहळ्यात भाषणाला सुरुवात केली. आपल्या भाषणात गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आणि आठवणी सांगत 2014 च्या निवडणुकांवेळचा किस्साही मुख्यमंत्र्यांनी सांगितला. मोदींना उधारीवर मुंडे साहेबांना दिलंय. आम्ही त्यांना परत आणणार आणि मुख्यमंत्री पदावर बसवणार हे मी म्हणायचो. पण, दुर्दैवाने ते शक्य होऊ शकला नाही असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
राज्यात काम केलेले नेते दिल्ली गेले तर हरवुन जातात. मात्र, लोकसभेत अवघ्या काही दिवसात मुंडेसाहेबांनी त्यांचे काम दाखवले होते. पण, त्यांना तेथे काम करण्याची संधी मिळाली नाही. गोपीनाथ मुंडेंनीच देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र असा उल्लेख केला होता. मात्र, सत्ता आल्यावर आम्ही त्यांनाच मुख्यमंत्री करणार होतो. मोदींना उधारीवर मुंडे साहेबांना दिलंय. आम्ही त्यांना परत आणणार आणि मुख्यमंत्री पदावर बसवणार हे मी म्हणायचो. पण, दुर्दैवाने ते शक्य होऊ शकला नाही असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
आपण थोरपुरुषांचा पुतळा का बांधतो तर, त्यांच्या दाखवलेल्या मार्गांवर चालण्यासाठी प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणूण. वर्षानुवर्षे मराठवड्याला तहानलेला ठेवायचं काम हे आधीच्या सरकारने केले. पण, आपण सत्तेत आल्यानंतर बीडपर्यंत आता पाणी पोहोचलेलं आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे मुंडे साहेबांचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळवून नेण्यात आले होते, ते आपण वापस घेतले. गोदावरी परिक्रमाही गोपीनाथ मुंडेंनी केली होती. आता, त्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. रेल्वेचे ही काम सुरू आहे. एक एक करून मुंडे साहेबांचे जे जे स्वप्न आहेत ते आम्ही पूर्ण करू . रेणापूर हा आता लातूर ग्रामीण झालाय, त्यामुळे तुमची सेवा म्हणजे मुंडे साहेबांची सेवा आहे. लातूरची पाणीपुरवठा योजना आणि सामान्य रुग्णालय यांना आजच मी मान्यता देतो, अशी घोषणाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
https://www.youtube.com/watch?v=p6dzjdj4y5e
हेही वाचा
आमच्या कुटुंबाला संघर्ष पाचवीला पूजलेला; मुख्यमंत्र्यांसमोर धनंजय मुंडेंची फटकेबाजी, केली ‘ही’ मागणी
आणखी वाचा
Comments are closed.