व्ही. के. सिंगने अजितदादांच्या विमान अपघाताच्या अहवालात फेरफार केला? DGCA मधील भ्रष्टाचार समोर येताच रोहित पवार आक्रमक

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातील भ्रष्टाचार सीबीआयने चव्हाट्यावर आणला आहे. ड्रोन आयातील्चाय परवानग्या देण्यासाठी अडीच लाखांची लाच स्वीकारताना सीबीआयने डीजीसीएचे उपामहासंचलक आणि खासगी कंपनीच्या उपाध्यक्षाला बेड्या ठोकल्या. हा प्रकार समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. अटक झालेला छोटा मासा असून याहून मोठमोठे मासे या यंत्रणेत आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली. व्ही. के. सिंगने अजितदादांच्या विमान अपघाताच्या अहवालात फेरफार केला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी अपघात झाला. मुंबईहून निघालेले चार्टर्ड विमान बारामती विमानतळावर कोसळले आणि यात अजित पवारांचा मृत्यू झाला. यानंतर रोहित पवार यांनी सातत्याने पत्रकार परिषद घेत व्हीएसआर कंपनी आणि व्ही. के. सिंग यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. डीजीसीएचे बडे अधिकारी त्यांना वाचवत असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला होता. आता डीजीसीएतील भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

डीजीसीएच्या Airworthiness विभागाच्या उपमहासंचालकाला सीबीआयने अटक केली असून एफआयआर झाली आहे. डीजीसीएमध्ये अनेक भ्रष्ट अधिकारी असल्याचे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत हे यामुळे सिद्ध झाले आहे. अटक झालेला तर छोटा मासा आहे, याहून मोठमोठे मासे या यंत्रणेत आहेत. लाच देऊन डीजीसीएमध्ये कामे होत असतील तर लाच देण्यात दलाली करण्यात पटाईत असलेला व्ही. के सिंग याने कशाप्रकारे दादांच्या अपघातसंदर्भातील कागदपत्रे क्लीन अप केले असतील याचा अंदाज येतो, असे रोहित पवारांनी म्हटले.

एकीकडे दादांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याची विनंती करून दोन महिने उलटले तरी सीबीआयने तपास हातात घेतला नाही, परंतु दुसरीकडे सीबीआय स्वतःहून ऍक्शन घेते हे विशेष म्हणावे लागेल. कदाचित टीडीपीच्या मंत्रालयाला इशारा किंवा अप्रत्यक्ष मेसेज दिला असावा म्हणूनच प्रादेशिक अस्मिता बाजूला सारून टीडीपीकडून डिलीमिटेशन संदर्भात केंद्र सरकारच्या आदेशांचे तंतोतंत पालन केले जात असावे, असेही रोहित पवार म्हणाले.

DGCA मधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर; अडीच लाखांच्या लाचखोरीप्रकरणी उपमहासंचालकसह कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हला अटक

Comments are closed.