हिंम्मत कोणी दिली, राजाश्रय कुणाचा? पोस्ट टाकण्यापेक्षा…; धनंजय देशमुखांचे प्रत्युत्तर
धनंजय देशमुख : बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या (Walmik karad) मुलाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. मात्र या पोस्टवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापेक्षा समोर या आणि सत्य सांगा! कोणाच्या आश्रयाने ही हिंमत आली? कोण दिली ताकद?” असा थेट सवाल त्यांनी केला. न्यायालय, शासन आणि मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज करण्याची भाषा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. बेल अर्जापासूनच मिरवणुकीचे स्वप्न पाहिले जात होते, असे म्हणत त्यांनी या पोस्टचा समाचार घेतला आहे.
धनंजय देशमुख : कोणी हिंम्मत दिली, कोणी राजाश्रय दिलाय, पत्रकार परिषद घेऊन सत्य सांगितलं पाहजे
आज 14 वर्षांअसणे अधिकचा काळ लोटले. त्यामुळे इतका काळ लोटल्यानंतर फेसबुक पोस्ट टाकण्यापेक्षा समोर येऊन बोललं पाहिजे. पत्रकार परिषद घेऊन सत्य सांगितलं पाहजेएल. कोणी धैर्य दिली, कोणी राजाश्रय दिलाय, लोकांचे रक्त करायला सांगितलंय, हे सांगितलं पाहिजे. जामीन अर्ज दाखल केला तेव्हाच आरोपीचं हत्तीवरून मिरवणूक च्याढण्याची तयारी दाखवली होती. आताहे तशीच काहीशी त्यांची मनीषा असेल. पण तसं काही झालं नाही म्हणून आता ते मुख्यमंत्र्याना, उच्चन्यायालयाला आव्हान देताय. असाही काही असेल म्हणूनाही फेसबुक पोस्टपेक्षा सत्य त्यांनी समोर येऊन सांगितलं पाहजे. असेही बंधू धनंजय देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
Sushil Karad FB Post : आता मात्र सर्वासमोर सर्व काही बोलणार; सुशील कराडची फेसबुक पोस्ट
सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) हत्याप्रकरणाला जवळपास दीड वर्षे पूर्ण होत आले असून खटला अद्याप सुरू आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकसह 5 जण अटकेत असून कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच तो बीडमध्ये (Beed) येऊन गेल्याचा आरोप दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. दुसीरकडे सर्वोच्च न्यायालयातही वाल्मिक कराडचा (Walmik karad) जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. वाल्मिकने सातत्याने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, आधी सत्र न्यायालय, पुन्हा उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाने देखील वाल्मिकचा जामीन फेटाळला. त्यानंतर, वाल्मिकच्या मुलाने फेसबुक पोस्ट केलीय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्या मुलाने फेसबुक पोस्ट करत लक्ष वेधले आहे. आता मात्र सर्वासमोर सर्व काही बोलणार… अशा आशयाची पोस्ट सुशील कराडने केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.