धनंजय देशमुख-नामदेव शास्त्री यांच्यातील संपूर्ण संभाषण जसंच्या तसं, नेमकं काय म्हणाले शास्त्री?
बीड: बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर चौफेर टीका होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. अशातच धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर (Bhagwangad) जाऊन महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) यांची भेट घेतली. यानंतर नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावप पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी असल्याची भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर मुंडेंना टार्गेट केलं जात असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा देखील झाली.
धनंजय देशमुख-नामदेव शास्त्री यांच्यातील संपूर्ण संभाषण जसंच्या तसं
धनंजय मुंडे- देशमुख कुटुंबाने कधीच जातीवाद केला नाही. देशमुख कुटुंबियांची जमीन मुंडे कुटुंब दोन पिढ्यांपासून कसत आहे, त्याची माहिती त्यांनी महंतांना दिली. प्रामाणिकपणे सांगतो. मनोहर मुंडेंचे चार मुले होते. दोन मुले पुण्यता होते. दोन मुले इथे. त्यांनी जे पिकवलं ते आम्ही खातो. देशमुख कुटुंबाने जातीवाद केला असता तर त्याच्या हत्येनंतर दिसलं असतं. दलित बांधावाला वाचवण्यासाठी गेला. आमची कोणतीही गुन्हेगारी नाही. १५ वर्ष सरपंच राहिलेल्या माणसाशी या लोकांनी संपर्क साधायला हवा होता. आरोपींवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आरोपींची मानसिकता तपासण्याची गरज आहे. ज्याला आरोपींची बाजू घ्यायची त्यालाच जातीयवादाचा अंश येत आहे. आम्ही सर्व दाखवलं आहे. यांच्या कार्यालयात बसायचे. त्यांच्या गाडीत फिरायचे. हा न्यायाचा लढा आहे. अतिशय क्रूर हत्या झाली आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्यासोबत आहे. राजकीय नेते, संप्रदायाचे लोक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आमच्यासोबत आहेत. न्यायाच्या भूमिकेत आहेत. अशावेळी लोकप्रतिनिधींना जातीयवादी म्हणू नका. नाही तर ते कोणत्याच न्यायाच्या भूमिकेत येणार नाही. न्याय मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना चुकीचं ठरवू नका
नामदेव शास्त्री – आरोपींना आम्ही माफ करणार नाही. आरोपींना आम्ही पाठीशी घालणार नाही. भगवान बाबांच्या गादीवर बसून आम्ही तुम्हाला शब्द देतो. आरोपीच्या पाठीमागे भगवानगड नाही. संतोष देशमुखांच्या पाठीमागे भगवानगड राहणार आहे. तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही गडाचेच आहेत.
भगवान गड तुमच्या पाठीशी, ही ग्वाही देतो – नामदेव शास्त्री
भगवान बाबाला मानणारं तुमचं कुटुंब आहे. जातीय सलोखा या गावात होता. यापूर्वी किती वेळा गडावर आले हे त्यांनी दाखवलं. भगवान गड तुमच्या पाठी कायम राहील ही ग्वाही देतो, असे वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केलं आहे. धनंजय देशमुखांचं म्हणणं आहे की, याला जातीयवादाचं स्वरुप देऊ नका, भगवान गड कायम स्वरुपी देशमुख कुटुंबाच्या पाठी उभं राहील. आरोपींची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर गुन्हे किती आहे, ते त्यांनी दाखवलं. संतोष अण्णाने किती काम केलं हे त्यांनी दाखवलं. ते मूळचे बाबाचे आहेत. हे आज कळालं. त्यांची जमीन तीन पिढ्यांपासून वंजारी कुटुंब करत आहे. जातीयवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे गादीवरून सांगणं आहे. आम्ही बसून बोलू. त्यांना दोन घास खाऊ घालू. त्यांना प्रसाद देऊ. संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळेल, असंही पुढे नामदेव शास्त्री म्हणाले.
धनंजय देशमुख घेणार नामदेव शास्त्रींची भेट
नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला होता. धनंजय देशमुख यांनी म्हटलं होतं की, एक चापट मारली म्हणून त्याच्या बदल्यात 10 चापटा त्यांनी मारल्या असत्या तरी चालले असते. मात्र, केवळ एकाच चापटेच्या बदल्यात अशा प्रकारचा भीषण खून करण्यात आला, असे म्हणत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका मांडली होती.
अधिक पाहा..
Comments are closed.