खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांव

सुरेश ढास वर अजय मुंडे: बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे (Santosh Deshmukh Murder Case) पाशवी दृश्य समोर आल्यानंतर धनंजय मुंडे  (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कौटुंबिक बाबींवर हल्लाबोल केला होता. यावरून धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे (Ajay Munde) यांनी सुरेश धस यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत खोक्या प्रकरणात सुरेश धसांना सहआरोपी करा, असे म्हटले होते. यावर सुरेश धस यांनी अजय मुंडे अजून लहान आहे. धनंजय मुंडे यांनी याला त्याला बोलायला लावण्याऐवजी स्वतः समोर येऊन बोलावं, खोका-बोका-चोखा सगळे सापडतील, असे आव्हान दिले होते. आता अजय मुंडे यांनी सुरेश धस यांना पुन्हा एकदा डिवचले आहे.

बीडमधील (Beed) एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाई (Khokya Bhai) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सतीश भोसले (Satish Bhosale) याला बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलीस आणि बीड पोलिसांनी (Beed Police) संयुक्तपणे ही कारवाई केली. सतीश भोसले हा सुरेश धस यांना जवळचा कार्यकर्ता असल्याने त्यांच्या टीका केली जात आहे. हाच धागा पकडत अजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय.

सुरेश धस काय पलटवार करणार?

धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे, असे म्हणत त्यांनी सुरेश धस यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. आता अजय मुंडेंच्या टीकेवर सुरेश धस काय पलटवार करणार? हे पाहणे महात्त्वाचे ठरणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Dada Khindkar Surrender: धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर पोलिस अधीक्षक कार्यालयात शरण; तरूणाला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Satish Bhosale : खोक्या उर्फ सतीश भोसले 6 दिवस कुठे होता? कसा पळाला? कुठे राहिला? पुणे-शिरूर-अहिल्यानगर-संभाजीनगर अन् शेवटी गाठलं प्रयागराज, पोलिसांनी असं घेतलं जाळ्यात

अधिक पाहा..

Comments are closed.