250 दिवसात बोललो नाही, पण आता या ताटातलं त्या ताटात जाऊ देणार नाही, भगवान गडावर धनंजय मुंडेंचा
धनंजय मुंडे भाषण: मी 250 दिवस शांत होतो. माझी बहीण मला आधार देत होती. माझ्या विरोधात मिडिया ट्रायल सुरू होती. मला एक सांगायचंय की, माझ्या विरोधात घोटाळे काढले, कोर्टात गेले, कोर्टाने मला क्लीन चिट दिली. जे कोर्टात गेले त्यांना लाख रुपयांचा दंड बसला. एवढं होऊन देखील मी शिक्षा भोगत आहे, असे वक्तव्य माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले आहे. बीड जिल्ह्याच्या भगवानगडावरील पंकजा मुंडे (Pankaja Mimde) यांच्या दसरा मेळाव्यातून (Dasara Melava) ते बोलत होते.
धनंजय मुंडे म्हणाले की, अभूतपूर्व हा दसरा मेळावा मुंडे साहेबांचा आहे. मी आपल्यासमोर नतमस्तक होतो. मेळावा होण्यासारखी परिस्थिती नव्हती. नद्यांना पूर आला, अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांसमोर संकट आले. आमची चर्चा झाली की, या दसऱ्याची परंपरा मोडायची नाही. मी आज फक्त आमदार आहे. मात्र माझी बहीण मंत्री मंडळात आहे. शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त मदत ताई मिळवून देतील, हा विश्वास आहे, असे त्यांनी म्हटले.
मी बरेच दिवस बोललो नाही (Dhananjay Munde Speech)
जे घोषणा द्यायला आलेत त्यांना मेळाव्याचे काही माहीत नाही. आज डोळ्यात पाणी येतं. मुंडे साहेबांनी ऐतिहासिक दसरा मेळावा केला. आज बहिणीचा अभिमान आहे. साहेब गेल्यानंतर त्यांनी हा मेळावा सुरू ठेवला. मुंडे साहेबांच्या हाताला धरून भगवान गडावर दसरा मेळावा जायचो. मी बरेच दिवस बोललो नाही. खामोश रहेना ठीक, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा आनंद, पण… (Dhananjay Munde on Reservation)
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी कार्यकर्ता आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले याचा आम्हाला आनंद आहे. पण काही जणांना आरक्षणाच्या आडून ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आहे. हे कुणाला फसवत आहेत? स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी सुरू आहे. सरकारने सर्व काही केलं. आता या ताटातले काढून त्या ताटात जाऊ देणे हे योग्य नाही, असे मोठे विधान त्यांनी यावेळी आरक्षणाबाबत केले.
अजूनही मी शिक्षा भोगतोय (Dhananjay Munde Speech)
मी 250 दिवस शांत होतो. माझी बहीण मला आधार देत होती. माझ्या विरोधात मिडिया ट्रायल सुरू होती. मला एक सांगायचंय की, माझ्या विरोधात घोटाळे काढले, कोर्टात गेले, कोर्टाने मला क्लीन चिट दिली. जे कोर्टात गेले त्यांना लाख रुपयांचा दंड बसला. एवढं होऊन देखील मी शिक्षा भोगत आहे. मी कुणाला विरोध केला नाही आणि करणारही नाही, असे त्यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=aamjj-itw4U
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.