धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, CM फडणवीसांनी एका वाक्यात भरला दम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राज्यपालांनी देखील तो स्वीकारला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मात्र, आपल्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचे सांगत मुंडे राजीनामा (राजीनामा) देण्यास तयार नव्हते. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही, दोषी आढळल्यानंतर कुणालाही सोडणार नाही, असे म्हणत धनंजय मुंडेंचा राजीनामा लांबणीवर टाकत होते. अखेर, माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी देखील राजीनामा दिला होता, असे म्हणत अजित पवारांनी मन की बात सांगितली. मात्र, तरीही मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते. विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानंतर समोर आलेले भयानक फोटो पाहून राज्यात तीव्र संताप व्यक्त झाला. त्यानंतर, धनंजय मुंडेंनी (Dhananjay munde) मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राजीनाम्याचा आग्रह करत इशाराच दिला होता.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापूर्वी व्हायरल फोटोनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. तसेच, धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावाच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केल होते. आता, याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यापासूनच राजीनाम्याबाबत ठोस भूमिका घेतल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रारंभीपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आग्रही होते. यापूर्वी 3/4 वेळा अजितदादांशी त्यांनी तशी चर्चा देखील केली होती. स्वत: धनंजय मुंडे यांनाही समजावून सांगितले होते. पण, धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते. शेवटी एका क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी अशी भूमिका घेतली की, जर तुम्ही राजीनामा देणार नसाल, तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल. मुख्यमंत्र्यांच्या या एका वाक्याच्या इशार्यानंतर वातावरण बदलल्याची माहिती सुत्रांनी दिली.
उद्याच्या उद्या राजीनामा द्या
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना उद्याच्या उद्या राजीनामा द्या, असे मुख्यमंत्र्यांनी काल पुन्हा सांगितले आणि आज सकाळी मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला. प्रारंभीपासूनच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक आणि ठोस भूमिका घेतली होती, अशी सूत्रांची माहिती आहे. म्हणूनच एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
हेही वाचा
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
अधिक पाहा..
Comments are closed.