परिवहनमंत्र्यांच्या जिल्ह्यातच ST इंजिनिअर जाळ्यात; कॅन्टीनचा दरवाजा बंद करण्यासाठी 10 हजारांची
धारशिव गुन्हा: परिवहन मंत्री व धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिल्ह्यातच ST अभियंत्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय . कॅन्टीन चा दरवाजा बंद करण्यासाठी 10 हजारांची लाच या अभियंत्याने मागितली होती .यातील नऊ हजार रुपये स्वीकारताना तो ACB च्या जाळ्यात सापडला . शशिकांत उबाळे असं लाचखोरी करणाऱ्या या ST अभियंत्याचे नाव आहे . धाराशिव येथील एसटी महामंडळाच्या अभियंत्याने एसटी कॅन्टीन चा दरवाजा बंद करण्यासाठी ही लाच मागितली होती .
नेमका प्रकार काय ?
राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री असलेल्या प्रताप सरनाईकांच्या जिल्ह्यातच ST अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले आहे .धाराशिव मधील एसटी विभागीय कार्यालयात शशिकांत उबाळे हे अभियंता या पदावर कार्यरत असून एसटीच्या कॅन्टीनचा दरवाजा बंद करण्यासाठी त्याने दहा हजार रुपयांची लाच मागितली .यातील 9 हजार रुपये स्वीकारताना उबाळे याला लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं . धाराशिवच्या विभागीय कार्यालयातून या राज्य परिवहन मार्ग महामंडळातील अभियंत्याला एसीबीने ताब्यात घेतले आहे . शशिकांत उबाळे असे ताब्यात घेतलेल्या लाचखोर अभियंत्याचे नाव आहे .लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अभियंत्याची कसून चौकशी केली जात आहे . राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवच्या पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात ST अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना गंभीर मानली जात आहे . या प्रकरणाची चौकशी सुरू असून अधिक तपास केला जात आहे .
अंगावरच्या दागिन्यांमुळे नियत फिरली, ज्येष्ठ महिलेला शेजाऱ्याने संपवलं
तुळजापूरमधून बेपत्ता झालेल्या चित्रा पाटील प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. सोलापूर ते लातूर बायपासवरील नळदुर्ग रोड ब्रिजजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला असून, गळा दाबून खून झाल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपीने केवळ सोनं मिळवण्यासाठी हा थरारक गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं आहे. विशेष म्हणजे, हा आरोपी म्हणजे पाटील कुटुंबाचाच जवळचा ओळखीचा मुलगा असून, त्याला घरात पोटच्या मुलासारखं वागवलं जात होतं. संग्राम पाटील यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानुसार, ओम नितीन निकम या शेजारी राहणाऱ्या तरुणाने ही हत्या केल्याचं समोर आलं आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करून कसून चौकशी केली. त्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.