धुळ्यात बनावट दारु निर्मितीचे रॅकेट उद्ध्वस्त, 37 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
धुळे क्राईम न्यूज: आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका (Mahapalika Election) आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धुळे (Dhule) राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. बनावट दारु निर्मितीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तब्बल 37 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक टक देखील करण्यात आली आहे.
एका पत्र्याच्या शेडमध्ये हा गोरखधंदा सुरु
मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने शिवारात ‘अॅग्रो टेक्नर्स फार्मर प्रोड्युसर कंपनी’च्या नावाखाली एका पत्र्याच्या शेडमध्ये हा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. या आधारे पथकाने छापा टाकला असता, तिथे बनावट देशी-विदेशी मद्य, ब्लेंड आणि निर्मिती साहित्य आढळून आले. या कारवाईत एका चारचाकी वाहनासह तब्बल 37 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, प्रफुल्ल भोई या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली असून, नाताळ आणि नववर्षाच्या तोंडावर प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
हातातील घड्याळाच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने शोधला वृद्ध महिलेचा मारेकरी
धुळे शहरातील मोहाडी परिसरातील दंडेवाले बाबा नगरात काल एका वृद्ध महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेतील आरोपीला शोधण्यात पोलिसांना अवघ्या काही तासात यश आले असून याप्रकरणी सागर राजू कोळी याला ताब्यात घेण्यात आले आहे. धुळे शहरा जवळील मोहाडी येथे असलेल्या दंडीवाले बाबा नगरात राहणाऱ्या लिलाबाई सूर्यवंशी ह्या 80 वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना काल घडली होती या महिलेच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या चोराला सदर महिलेने रंगेहात पकडल्याने त्याला चोरी करण्यापासून प्रतिकार केल्याने त्याने बुद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती, या मारेकऱ्याने हातात घातलेले घड्याळ घटनास्थळी मिळून आले होते. या घड्याळाचा फोटो सोशल मीडियावर पोलिसांनी व्हायरल केल्यानंतर सदर व्यक्तीची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला परिसरातील व्यक्तींकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्याचा शोध घेतला असता दंडेवाले बाबा नगरात राहणारा सागर राजू कोळी हा 24 वर्षे तरुणच महिलेचा मारेकरी असल्याचे निष्पन्न झाले.. सागर राजू कोळी याला अवघ्या काही तासातच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pune Crime Drink & Drive: पोलीस कर्मचाऱ्याची दारु पिऊन सहा गाड्यांना धडक, पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
आणखी वाचा
Comments are closed.