धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार?

धुळे : राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे महानगरापालिकेची निवडणूक देखील जाहीर झाली आहे. धुळे महानगरपालिकेची स्थापना 30 जून 2003 मध्ये झाली होती. डिसेंबर 2023 पासून धुळे महापालिकेत प्रशासकातर्फे कामकाज चालवण्यात येत होतं. आता 16 जानेवारीनंतर धुळे महापालिकेचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती जाईल. धुळे महापालिकेची निवडणूक  19 वॉर्डच्या 74 नगरसेवकांच्या निवडीसाठी होणार आहे.

Dhule Municipal Corporation : धुळे महापालिकेतील राजकीय चित्र

धुळ्यात भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील पक्ष प्रभावी आहेत. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानं काँग्रेस देखील ताकदीनं या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे मविआ म्हणून लढतात की स्वतंत्र ते पाहावं लागेल. याशिवाय धुळ्यात समाजवादी पार्टी, बसपा, एमआयएम यांचं देखील अस्तित्व आहे. धुळ्यात भाजपकडे मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत पक्षानं यश मिळवल्यानं पक्षाचे कार्यकर्ते उत्साहात आहेत. विशेष बाब म्हणजे धुळे महापालिका क्षेत्रात 14 वॉर्ड मुस्लीम मतदार बहुल आहेत. या ठिकाणी भाजपनं गेल्यावेळी उमेदवार दिले नव्हते. यावेळी देखील भाजप तिच रणनीती राबवण्याची शक्यता आहे.

धुळे महापालिका वॉर्ड रचना आणि आरक्षण

धुळे महापालिका निवडणुकीसाठी 19 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. या वॉर्डमधून 74 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवण्यात आलं आहे. त्यामुळं धुळे महापालिकेत 37 महिला नगरसेवक निवडून येणार आहेत. सामाजिक आरक्षणाचा विचार केला असता धुळे महापालिकेच्या 74 जागांपैकी 6 जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी 3 जागा महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 5 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. यापैकी देखील 3 जागा महिलांसाठी असतील. नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी प्रवर्गासाठी 19 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पैकी 10 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. तर, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 44 जागा आहेत. त्यापैकी 21 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.

धुळे महापालिका मतदारसंख्या

धुळे महापालिकेतील एकूण 19 प्रभागात 4 लाख 30 हजार 387 मतदान निश्चित झाले आहे.त्यात 2 लाख 21 हजार 766 पुरुष, 2 लाख 8 हजार 580 महिला तर 41 इतर मतदार आहेत. धुळ्यात आता सात वर्षानंतर निवडणूक होत आहे. धुळ्यात1 लाख 60 हजार नवमतदारांची भर पडली आहे. या निवडणुकीत 4 लाख 30 हजार 387 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतात.

धुळे महापालिका निवडणूक 2017 आणि 2012 चा निकाल

2017 चा निकाल  पक्ष जागा 74 2012 चा निकाल पक्ष जागा 70
भाजप 50 भाजप 03
राष्ट्रवादी 08 राष्ट्रवादी ३४
काँग्रेस 06 काँग्रेस ०७
एमआयएम 04
एसपी 02 एसपी 03
बसपा 01 बसपा 01
शिवसेना 01 शिवसेना 11
लोक संघर्ष 01 इतर 01
अपक्ष 01 अपक्ष 10

धुळे महापालिका महापौरांची नावं :

देव रामभाऊ करनकाळ

के.डी. मेकॅनिक

मोहन तुळशिराम नवले

मंजुळा तुळशिराम गावीत

जयश्री कमलाकर अहिरव

कल्पना सुनील महाले

चंद्रकांत मधुकर सोनार

प्रदीप बाळासाहेव कर्पे (दोनवेळा)

प्रतिभा चौधरी

धुळे महापालिका वॉर्डनिहाय आरक्षण

धुळे महापालिका

प्रभाग क्रमांक १

प्रभाग क्रमांक 1 अ – ओबीसी महिला

प्रभाग क्रमांक 1 ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 1 क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 1 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 2

प्रभाग क्रमांक 2 अ – अनुसूचित जमाती

प्रभाग क्रमांक 2 ब – ओबीसी महिला

प्रभाग क्रमांक 2 क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 2 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 3

प्रभाग क्रमांक 3 अ – अनुसूचित जमाती महिला

प्रभाग क्रमांक 3 ब – ओबीसी महिला

प्रभाग क्रमांक 3 क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 3 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 4

प्रभाग क्रमांक 4 अ – ओबीसी महिला

प्रभाग क्रमांक 4 ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 4 क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 4 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 5

प्रभाग क्रमांक 5A – अनुसूचित जाती

प्रभाग क्रमांक 5 ब – ओबीसी महिला

प्रभाग क्रमांक 5 क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 5 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 6

प्रभाग क्रमांक ६ अ – ओबीसी

प्रभाग क्रमांक 6 ब – ओबीसी महिला

प्रभाग क्रमांक 6 क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 6 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 7

प्रभाग क्रमांक 7 अ – अनुसूचित जाती महिला

प्रभाग क्रमांक 7 ब – अनुसूचित जमाती

प्रभाग क्रमांक ७ अ – ओबीसी महिला

प्रभाग क्रमांक 7 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 8

प्रभाग क्रमांक 8 अ – अनुसूचित जाती

प्रभाग क्रमांक 8 ब – अनुसूचित जमाती महिला

प्रभाग क्रमांक ८ अ – ओबीसी महिला

प्रभाग क्रमांक 8 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ९

प्रभाग क्रमांक 9 अ – अनुसूचित जाती महिला

प्रभाग क्रमांक 9 ब – ओबीसी

प्रभाग क्रमांक 9 क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 9 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 10

प्रभाग क्रमांक 10 अ – अनुसूचित जाती

प्रभाग क्रमांक 10 ब – ओबीसी महिला

प्रभाग क्रमांक 10 क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 10 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 11

प्रभाग क्रमांक 11 अ – ओबीसी

प्रभाग क्रमांक 11 ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 11 क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 11 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 12

प्रभाग क्रमांक १२ अ – ओबीसी

प्रभाग क्रमांक 12 ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 12 क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 12 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १३

प्रभाग क्रमांक १३ अ – ओबीसी

प्रभाग क्रमांक 13 ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 13 क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 13 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 14

प्रभाग क्रमांक १४ अ – ओबीसी

प्रभाग क्रमांक 14 ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 14 क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 14 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 15

प्रभाग क्रमांक १५ अ – ओबीसी

प्रभाग क्रमांक 15 ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 15 क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 15 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 16

प्रभाग क्रमांक १६ अ – ओबीसी

प्रभाग क्रमांक 16 ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 16 क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 16 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 17

प्रभाग क्रमांक १७ अ – ओबीसी

प्रभाग क्रमांक 17 ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 17 क – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 17 ड – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 18

प्रभाग क्रमांक 18 अ – अनुसूचित जाती महिला

प्रभाग क्रमांक 18 ब – अनुसूचित जमाती महिला

प्रभाग क्रमांक 18 क – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १९

प्रभाग क्रमांक 19 अ – ओबीसी महिला

प्रभाग क्रमांक 19 ब –  सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 19 क – सर्वसाधारण

धुळे महापालिका निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025

नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025

उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026

अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026

मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026

मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026

हेदेखील वाचा

Comments are closed.