धुरंधरच्या ‘शरारत’ गाण्याचे भोजपुरी व्हर्जन सोशल मीडियावर व्हायरल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बाॅलिवुडच्या प्रसिद्ध गाण्यांची आवृत्ती ही कायम भोजपुरी भाषेमध्ये तयार होत असते. 2025 या वर्षात प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. प्रेक्षकांना हा चित्रपट जितका आवडला, तितकीच त्याची गाणीही लोकप्रिय झाली. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’मधील ‘शरारत’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. हे आयटम साॅंग प्रदर्शित होताच काही क्षणातच सोशल मीडियावर या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला. आणि व्ह्यूजच्या बाबतीत त्याने अनेक बॉलिवूड गाण्यांना मागे टाकले. या गाण्याला यूट्यूबवर 599 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्याची लोकप्रियता पाहता, आता त्याचे भोजपुरी व्हर्जन प्रदर्शित झाले असून, त्याला केवळ दोन दिवसांत 56 हजारांहून हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

बॉलिवूड गाण्यांचे भोजपुरी व्हर्जन बनवण्याचा ट्रेंड खूप जुना आहे. भोजपुरी कलाकार अनेकदा बॉलिवूड गाण्यांना भोजपुरी टच देताना दिसतात. आता पुन्हा एकदा असाच ट्रेंड दिसून येत आहे. ‘धुरंधर’मधील ‘शरारत’चे भोजपुरी व्हर्जन व्हायरल होत आहे. लोकांना भोजपुरी शैलीत पुन्हा तयार केलेले हे गाणे खूप आवडत आहे. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

मृत्युंजय कुमार या भोजपुरी कलाकाराने ‘शरारत’ चे गाणे भोजपुरी मधून गायले आहे. इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या या भोजपुरी व्हर्जनला दोन दिवसांत 8 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 56 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मृत्युंजय कुमारने केवळ गाण्याचा एक छोटा भागच नाही, तर संपूर्ण ‘शरारत’ गाणे गायले आहे. या भोजपुरी व्हर्जनमध्ये त्याची स्वतःची शैली आहे, पण चाल मात्र मूळ गाण्याचीच आहे. शरारत’ गाण्याचे भोजपुरी व्हर्जन हे प्रचंड लोकप्रिय होत असून, सोशल मीडियावर या गाण्यानेही धुमाकूळ घातला आहे.

Comments are closed.