आता बस्स… भारताकडून पराभूत झाल्यानंतर एलिसा हिलीचा मोठा निर्णय! ODI क्रिकेटमधून निवृत्तीची घो


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला विश्वचषक उपांत्य फेरी: ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीली हिने 2025 महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताकडून झालेल्या पराभवानंतर आपल्या वनडे कारकिर्दीबाबत मोठं संकेत दिलं आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर ती म्हणाली की, 2029 च्या पुढील विश्वचषकावेळी ती कदाचित संघाचा भाग नसेल. गुरुवारी नवी मुंबईत झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 338 धावा केल्या होत्या, मात्र भारताने 5 विकेटने विजय मिळवत त्यांना स्पर्धेबाहेर केलं. या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद 127 धावा करत भारताला शानदार विजय मिळवून दिला, तिचा एक सोपा कॅच मात्र हीलीकडून सुटला होता.

मोठ्या सामन्यातील या पराभवानंतर हीली खूप निराश दिसली. नाणेफेक जिंकून तिने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभारली, पण नंतर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक दोघांनीही संधी गमावल्या. भारतीय संघाने जेमिमाच्या 127 आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या 89 धावांच्या जोरावर विजय मिळवला आणि अंतिम फेरीचं तिकीट पक्कं केलं.

ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीली काय म्हणाली?

पुढील विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या योजनांबद्दल विचारल्यावर हीली म्हणाली, “मी तिथे नसेन… मला वाटतं, हाच या पुढील चक्राचा खरा रोमांच आहे, आपण ते घडताना पाहू. पुढील वर्षाच्या मध्यात टी20 वर्ल्ड कप होणार आहे, जो आमच्या संघासाठी खूप रोमांचक ठरणार आहे. पण मला वाटतं, आमच्या वनडे क्रिकेटमध्ये पुन्हा काही बदल होतील. आम्ही बऱ्याच गोष्टी योग्य केल्या, काही चुका झाल्या, त्यातून शिकू आणि अधिक मजबूत परत येऊ.

पुढील महिला वर्ल्ड कप 2029 मध्ये होणार आहे. तेव्हा एलिसा हीली 39 वर्षांची असेल, आणि अलीकडच्या काळात झालेल्या दुखापतींमुळे तिचं पुढील काही वर्षं सातत्याने खेळणं अवघड दिसतं. तरीही ती खेळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यास तो सर्वांसाठी आश्चर्याचा विषय ठरेल. ती म्हणाली, “आजचा सामना चांगला होता, पण आम्ही स्वतःलाच नुकसान करून घेतलं. पहिल्यांदाच असं वाटलं की आम्ही शेवट नीट केला नाही, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही आघाड्यांवर चुका झाल्या.”

हे ही वाचा –

IND vs AUS 2nd T20 Weather Forecast : भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना होणार रद्द? मेलबर्नमधून धडकी भरवणारी अपडेट

आणखी वाचा

Comments are closed.