आगामी निवडणुकांमुळं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची खेळी खेळली? चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट
पुणे: आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) दणका देण्यासाठी पार्थ पवारांचे (Parth Pawar Land Scam) जमीन प्रकरण बाहेर काढले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ही खेळी खेळली. असा कयास माध्यमांनी बांधलाय. प्रत्यक्षात असं अजिबात नसल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. रुटीनमध्ये हे प्रकरण समोर आलं आहे. महापालिका निवडणुकांशी या प्रकरणाचा अजिबात संबंध नाही, असं मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे.Parth Pawar Land Scam)
Chandrakant Patil: देवेंद्र फडणवीस कोणत्याच भ्रष्टाचाराला सहन करत नाहीत
याबाबत माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सुर्याला जे दिसत नाही ते पत्रकाराला दिसतं, त्यामुळे तुम्ही पत्रकारांनी कालपासून हा एक आपला अंदाज मार्केटमध्ये टाकला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत धक्का देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी खेळली मोठी खेळी पण, असं काही नाहीये, रूटीनमध्ये एखादा विषय समोर येतो आणि त्याची पण चौकशी व्हायची बाकी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याच भ्रष्टाचाराला सहन करत नाहीत, त्यांनी तातडीने तहसीलदाराला निलंबित केलं आहे. मोठे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.फौजदारी दावा कोणाकोणावर करायचा त्याबाबत यादी झाली आहे, त्या वेगाने तपास पुढे चालला आहे. त्यामुळे आपण आत्ताच पार्थ पवारांची जबाबदारी आहे की, त्यांच्या कंपनीची आहे. हे सगळं चौकशीअंती बाहेर येईल, त्या सगळ्याचा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काहीही कसलाही संबंध नाही.
Parth Pawar Land Scam: नेमकं प्रकरण काय?
पुण्याच्या मुंढवा भागातील वादग्रस्त जमिन खरेदी प्रकरणात (Parth Pawar Land Scam Pune) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) याचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह आतापर्यंत 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र हे करताना पोलिसांनी अजब प्रकार केलाय. अमेडिया कंपनीत 99 टक्के भागीदारी असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत. तर केवळ एक टक्का भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं सांगितलं. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळेच अजित पवारांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होतोय का? हा प्रश्न विचारला जातोय.
BJP VS NCP: भाजपने कोंडी केल्याची चर्चा का?
गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं पुण्यातील जैन बोर्डींगच्या जमिनीच्या गतीत घोटाळ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली. मोठ्या आरोपांना मुरलीधर मोहोळ यांना समोर जावं लागलं आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुण्याचा भाजपचे नेतृत्व मुरलीधर मोहोळ करणार आहे. भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी हा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच आहे. मग ती पुणे महापालिकेची निवडणूक असो पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असो पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका 2017 मध्ये भारतीय जनता पक्षांनी जिंकल्याच आणि आता जिल्हा परिषद हे भाजपचं पुढचं लक्ष आहे. त्यासाठी भोरचे संग्राम थोपटे काँग्रेसचे माजी आमदार आणि पुरंदरचे संजय जगताप काँग्रेसचे माजी आमदार भाजपने स्वतःच्या पक्षात घेतले आणि आता अजित पवारांच्या या अशा कोंडी करण्यातून भारतीय जनता पक्षांनी आपला इरादा पुन्हा एकदा स्पष्ट केलाय. भारतीय जनता पक्षाचे जे मित्र पक्ष असतात. मग ठाकरेंची शिवसेना असो किंवा इतर राज्यांमध्ये वेगवेगळे पक्ष असोत भारतीय जनता पक्षाच्या या राजकारणाचा अनुभव वेळोवेळी भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांनी घेतला आहे. अजित पवार आता तो अनुभव घेत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.