कबर खोदणे आणि मांस खाणे.
भारत हे जैवबहुविधतेने नटलेले राष्ट्र आहे. उत्तर प्रदेश हे भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. या राज्यात माणसांची दाटीवाटी असली तर, जैवबहुविधताही मोठ्या प्रमाणात आहे. अनेक दुर्मिळ जीवांचे वास्तव्य येथे आहे. त्यांच्यात ‘कबर बिज्जू’ या नावाने ओळखला जाणारा एक जीव असून तो कबरी उकरुन त्यांच्यात पुरलेल्या मृतदेहांचे मांस खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. इतकेच नव्हे, तर तो उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागांमधील घरांमध्ये रात्रीच्या वेळी घुसूर झोपलेल्या बालकांवरही हल्ले करतो, अशी माहिती त्याच्यासंबंधी दिली जाते.
या प्राण्याला हनी बेझर किंवा एशियन पाम सिवेट या नावानेही ओळखले जाते. हा एक सर्वभक्षी प्राणी असून तो किडे, फळे, झाडांची मुळे, पाने, मेलेल्या प्राण्यांचे मांस आणि मानवी मृतदेहांचे मांसही खातो. हा प्राणी मुख्यत: उत्तर प्रदेशमध्ये तराई भागातील वनप्रदेशांमध्ये आढळतो. तो आपल्या बळकट पंजांनी अतियश वेगाने माती उकरुन बीळ खोदतो. त्याचे शास्त्रीय नाव ‘वुल्पेस बेंगेलेन्सिस’ असे असून तो कबरीही पोखरुन आतील मानवी मृतदेहांचे मांस खातो. म्हणून त्याला स्थानिक भाषेत ‘कबर बिज्जू’ अशी संज्ञा आहे. बीळ खोदण्याची त्याची पद्धती अशिशय शास्त्रशुद्ध असते. तो पुढच्या पायांनी माती उकरतो आणि मागच्या पायांनी ती मागे ढकलतो. त्यामुळे अतिशय वेगाने तो बीळ खोदू शकतो. त्याचे पाळीव प्राण्यात रुपांतर केले जाऊ शकत नाही. तो नदी आणि सरोवरे यांच्या परिसरात वास्तव्य करतो. तो माणसाचा संपर्क टाळतो. तो माणसाळत नाही, असे दिसून आले आहे. माणसाची चाहूल लागली, तरी तो पळून जातो. माणसेही त्याला घाबरुनच असतात. हा प्राणी एकटा किंवा कळपाने राहू शकतो. भूमीखाली लांबच लांब बिळे करुन तो त्यांच्यात वास्तव्य करतो. त्याचा कळप माणसांवरही हल्ला करु शकतो. उत्तर प्रदेशातील हापूर, मथुरा, इटावा, प्रयागराज आदी भागांमध्ये त्याचे अस्तित्व अधिक प्रमाणात आढळते. तथापि, तो दुर्मिळ प्राण्यांपैकी एक आहे. तो वन्यप्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असल्याने त्याची शिकार केली जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याची संख्या अलिकडच्या काळात वाढताना दिसून येते.
Comments are closed.