मुंबईत उद्योजक अन् पत्नीला ‘डिजीटल अरेस्ट’ दाखवून 58 कोटी रुपये लुटले; नेमकं काय घडलं?


मुंबईत डिजिटल अटक मुंबईत उद्योजकाला ‘डिजीटल अरेस्ट’ दाखवून 58 कोटी रुपये लुटल्याची धक्कादायक घटना (Digital Arrest) समोर आली आहे. सदर प्रकरणी सायबर क्राइम पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली असून पैशांचा माग काढणे सुरू आहे.

ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करुन उद्योजक आणि त्याच्या पत्नीला ‘डिजीटल अरेस्ट’ करुन लुटण्यात (Digital Arrest Mumbai) आले. आरोपींनी 18 बँक खाती वापरुन पैसे काढून घेतले. अब्दुल नासीर खुल्ली, अर्जुन कडवासरा,जेठाराम कडवासरा अशी आरोपींची नावे आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात अडकल्याचे सांगून केले ‘डिजीटल अरेस्ट’मध्ये फसवण्यात आले. दरम्यान, 9 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर दरम्यान उद्योजकाने आरटीजीएसद्वारे 58.13 कोटी रुपये दिले.

डिजीटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय? (What exactly is digital arrest?)

डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल स्वरुपात अटक. या प्रकारात एखादी व्यक्ती पोलीस असल्याचं सांगून किंवा ईडी किंवा सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगून मेसेज पाठवतो किंवा थेट व्हीडिओ कॉल करतो. तुम्हाला ड्रग्स किंवा मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट करत असल्याची बतावणी करतो. डिजिटल अरेस्ट हा एक नव्या प्रकारचा ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार आहे, ज्यामध्ये सायबर गुन्हेगार लोकांना सरकारी अधिकारी, पोलीस, किंवा कायदा अंमलबजावणी यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून भीती दाखवतात आणि पैशांची जबरदस्तीने वसुली करतात.

कसा घडतो डिजीटल अरेस्ट? (How does digital arrest happen?)

फोन किंवा व्हिडिओ कॉल येतो, गुन्हेगार स्वतःला सायबर सेल, पोलिस, किंवा कुरिअर एजन्सीचा अधिकारी म्हणून ओळख करून देतो.

ते म्हणतात की, तुमच्या नावावर बेकायदेशीर पार्सल सापडले आहे.

तुमचा आधार किंवा पॅन कार्ड गुन्ह्यात वापरला गेला आहे.

किंवा तुम्हाला तपासासाठी अटक केली जाईल.

त्यानंतर, ते व्हिडिओ कॉलवर ठेवून ‘डिजिटल अरेस्ट’ करतात, म्हणजेच त्या व्यक्तीला मोबाईल बंद करू नका, जागेवरच राहा, असे सांगतात.

पुढे ते धाकदपटशा देऊन पैसे मागतात, म्हणतात की “तपास संपेपर्यंत जामीन किंवा सिक्युरिटी फी भरा.”

काही वेळा ते खोटे पोलीस ओळखपत्र, नोटिसा, किंवा FIR दाखवतात.

डिजीटल अरेस्टपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? (How to protect yourself from digital arrest?)

अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका.

सरकारी यंत्रणा कधीही फोनवर पैसे मागत नाही.

कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, खाते तपशील देऊ नका.

पोलीस स्टेशन किंवा सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर लगेच तक्रार करा.

cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तक्रार नोंदवा.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Digital Arrest : डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? पोलीस असं करू शकतात का? व्हिडीओ कॉल आला तर काय कराल? जाणून घ्या नव्या फ्रॉडबद्दल A To Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.