दिग्विजय सिंह यांची 'सनातन स्वाभिमान यात्रा' सुरू
माजी मुख्यमंत्र्यांना मिळाली नाही काँग्रेसची साथ
इंदोर:
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यांदरम्यान मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सत्य सनातन स्वाभिमान यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा वैयक्तिक स्वरुपाच असून याचा काँग्रेसशी कुठलाच संबंध नाही असे दिग्विजय यांनी स्पष्ट केले. तर तर काँग्रेसनेही या यात्रेशी कुठलेच देणेघेणे नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. दिग्विजय सिंह यांची ही पदयात्रा मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातून जाणार आहे. यात्रेदरम्यान राम मंदिरातील कथित दानचोरीचा मुद्दा उपस्थित करू शकतात. तर दिग्विजय हे उच्चवर्णीय अन् सनातनचा मुद्दा उपस्थित करून विरोधी पक्षांच्या आघाडीच्या पीडीए नॅरेटिव्हला बिघडवू शकतात अशी भीती समाजवादी पक्षाला आहे. अशास्थितीत उत्तरप्रदेशातही काँग्रेसने यापासून अंतर राखले आहे. दान चोरी आणि मंदिर उभारणीत कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यास याला सनातनवरील हल्ला ठरविण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो अशी काँग्रेसला भीती वाटत आहे.
Comments are closed.