जिम ट्रेनर बनला भोंदू बाबा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अघोरी पूजा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. रिदम पांचाळ ऊर्फ माँटी पांचाळ असे त्याचे नाव आहे. माँटी पूर्वी जिम ट्रेनर होता. आपल्या अंगात देव येतो, तुम्हाला मुक्ती मिळवून देतो असे सांगून तो लोकांकडून बकऱ्याचे काळीज, लिंबू, राख आदी मागवत असायचा. रिदम हा मालाड पूर्व येथे राहतो. पूर्वी जिम ट्रेनर होता. काही महिन्यांपासून तो मालाड पूर्व येथील मैदानात दरबार भरवत होता.

Comments are closed.