पंतप्रधानांसोबतचे डीपफेक फोटो काढण्याचे निर्देश
टी. भा. प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी पंतप्रधानासोबतच्या डीपफेक छायाचित्र प्रकरणात एका महिलेला पोलिस संरक्षण दिले. या महिलेने आरोप केला आहे की, कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते सौरभ दास, अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि रत्ना सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे तिचे एक कथित डीपफेक छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करून प्रसारित केले आणि त्यानंतर तिला धमक्या मिळाल्या.
सदर याचिका तातडीच्या सुनावणीसाठी घेतल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले. हा केवळ त्या महिलेचाच नव्हे, तर देशाच्या पंतप्रधानांचाही प्रश्न असल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाने आक्षेपार्ह छायाचित्रे तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले. जर ते संवेदनशील नसतील, तर आम्ही त्यांना संवेदनशील बनवून देऊ, असा इशारा उच्च न्यायालयाने दिला. अधिवक्ता उमेश शर्मा यांनी खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला आणि सांगितले की, या आरोपांच्या संदर्भात आधीच एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.