‘एक दहशतवादी देश मला हा प्रश्न विचारतोय…’, खोडसाळपणा करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला एस. जयशंकर यांचे सडेतोड उत्तर
संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेमध्ये हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना एका पाकिस्तानी पत्रकाराने खोडसाळ प्रश्न विचारला. दहशतवादाच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारणाऱ्या या पाकिस्तानी पत्रकाराला जयशंकर यांनी सडेतोड उत्तर दिले. जयशंकर यांनी एका वाक्यात पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद केली.
न्यू यॉर्कमधील एका पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बोलत असताना एका पाकिस्तानी पत्रकाराने त्यांना मध्येच अडवून दहशतवादाशी संबंधित एक खोडसाळ प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. तुमचे सरकार पाकिस्तानमध्ये दहशतवादाला खतपाणी घालणे कधी बंद करणार? हिंदुस्थान सरकार पाकिस्तानमधील प्रॉक्सी टेररिझम कधी थांबवणार, हे तुम्ही सांगू शकाल का? असा बिनबुडाचा प्रश्न पाकिस्तानी पत्रकाराने विचारला.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अत्यंत संयमाने आणि गंभीरतेने हा प्रश्न ऐकून घेतला. त्यानंतर त्यांनी अवघ्या एका वाक्यामध्ये या प्रश्नाचे उत्तर देत पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद केली. एक दहशतवादी देश मला हा प्रश्न विचारत आहे, असे म्हणत जयशंकर हसले आणि तिथून निघून गेले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे.
#पाहा | 81 वे UNGA अधिवेशन | “एक दहशतवादी देश मला हा प्रश्न विचारत आहे,” ईएएम डॉ. एस जयशंकर यांनी दहशतवादाच्या 'प्रश्ना'ने ईएएमला हेलपाटे मारण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नाला उत्तर देताना म्हटले आहे. pic.twitter.com/wIfu9OUhfO
— ANI (@ANI) 25 सप्टेंबर 2026
Comments are closed.