चान्सलर मर्ज यांच्यासोबतच्या वादानंतर ट्रम्प यांची सटकली, जर्मनीतून 5 हजार सैनिक माघारी बोलावणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेने जर्मनीतून 5 हजार सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. हे सैन्य पुढील 6 ते 12 महिन्यांत अमेरिकेत पोहोचेतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यात झालेल्या वादानंतर अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

काही दिवसांपूर्वी फ्रेडरिक मर्ज यांनी अमेरिकेवर टीका करताना म्हटले होते की, अमेरिकेला इराणविरुद्धच्या युद्धातून बाहेर कसे पडावे हे माहिती नाही. चर्चा टाळण्यात इराणचा हात पुणी धरू शकत नाही. अमेरिकेला कोणत्याही निष्कर्षाशिवाय, इस्लामाबादपर्यंत ये-जा करावी लागेल. अमेरिकेला इराणसमोर अपमानित व्हावे लागेल, असे म्हटले होते. मर्ज यांच्या या विधानावर ट्रम्प यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मर्ज हे खूप वाईट काम करत आहेत. त्यांना वाटते की, इराणकडे अणुबॉम्ब असणे ही चांगली गोष्ट आहे. त्यांना वास्तवाची जाणीव नाही, असे ट्रम्प म्हणाले.

जर्मनीत ३६ एक हजार अमेरिकन लष्करी तैनात

डिसेंबर 2025 पर्यंत जर्मनीमध्ये 36 हजारांहून अधिक अमेरिकन सैन्य तैनात होते. इटलीमध्ये 12 हजार तर ब्रिटनमध्ये 10 हजार अमेरिकन सैनिक तैनात आहेत. जर्मनीमधील अमेरिकन लष्करी तळ दीर्घकाळापासून युरोपमध्ये अमेरिकेच्या सामरिक उपस्थितीचा महत्त्वाचा भाग राहिले आहेत. अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये इराणवरून तणाव वाढला आहे. युरोपीय देशांनी इराण युद्धात ट्रम्प यांना साथ देण्यास अनेकदा नकार दिला आहे.  ट्रम्प यांनी इटली आणि स्पेनमधूनही सैन्य मागे घेण्याचे संकेत दिले आहेत.

Comments are closed.