पनीरच्या नावाखाली चीज अॅनालॉग विकू नका, एफडीएचा इशारा
खवय्यांकडून पनीरला चांगलीच मागणी असते; पण हॉटेल, ढाबा आदी ठिकाणी पनीरच्या नावाखाली चीज अॅनालॉग विकले जाते. याची गंभीर दखल घेत असे प्रकार थांबवा, चीज अॅनालॉगचा मेनू कार्डमध्ये उल्लेख करून त्याची विक्री करा; अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा एफडीएने दिला आहे.
पनीरचे विविध पदार्थांना खवय्यांकडून मोठी मागणी असते. नेमका याचाच फायदा उचलत पनीरच्या नावाखाली चीज अॅनालॉगची विक्री केली जाते. चीज अॅनालॉगला एफएसएसएआयकडून मान्यता आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, ढाबाचालक, उपाहारगृह तसेच खाद्यपदार्थ विकणाऱयांनी पनीरच्या नावाखाली चीज अॅनालॉगची विक्री करू नये. चीज अॅनालॉग हे त्याच नावाने विकावे. जर असे करताना कोणी आढळले नाही तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीएकडून देण्यात आला आहे.
Comments are closed.