तुझी फिगर झिरो आहे, गरज पडल्यास…; गुढीपाडव्याला साडीचा पदरही ओढला; नाशिकच्या टीसीएस कंपनीत का

नाशिक TCS कंपनी प्रकरण गुन्हे बातम्या नाशिक: नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणामुळे (Nashik TCS Company Case) कॉर्पोरेट जगतात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल (Nashik TCS Company Crime News) करण्यात आला आहे. याप्रकरणी सात जणांना अटक केली असून मुख्य सूत्रधार असलेली एचआर निदा खान मात्र गेल्या 20 दिवसांपासून फरार आहे.

नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहेत. याचदरम्यान, टीसीएसमधल्या पीडितेच्या जबाबातून अनेक संतापजनक बाबी समोर आल्या आहेत. रजा मेनन आणि आसिफ अन्सारींकडून मुलींचा छळ सुरु होता. तुझी फिगर झिरो आहे, गरज पडली तर कधीही बोलव…असं दोघं म्हणायचे. तसेच गुढीपाडव्याला आसिफ अन्सारीने साडीचा पदर ओढल्याची आपबिती टीसीएसमधील एका पीडितेने सांगितली आहे. पीडितेनं पोलिसांना दिलेल्या जबाबाची EXCLUSIVE कॉपी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. (Nashik TCS Company Crime News)

पोलिसांना दिलेल्या जबाबातून काय काय समोर आलं? (Nashik TCS Company Crime News)

  • काम जमत नसेल,अडचण असेल तर मला सांग…
  • गुढीपाडव्याला रजा मेननने माझ्या साडीचा पदर ओढला,मी वळून बघताच त्यानं वाईट नजरेनं हसत बघत राहिला..
  • आसिफ अन्सारी इतरत्र जागा असली तरी मुद्दाम माझ्या जवळ येऊन बसायचा…
  • आसिफ अन्सारी माझ्याशी लगट करायचा, स्पर्श करायचा, घाणेरड्या कॉमेंट करायचा…
  • आरोपी रजा मेनन मला ऑफिसमध्ये’प्लेअर’ म्हणायचा, काय चाललंय प्लेअर? असं विचारायचा…
  • आसिफने एकदा तर तुझी झिरो फिगर आहे म्हणाला, सांगूनही तो असेच बोलायचा…
  • तुमचा महादेव भगवान आहे का? गणेश महादेवाचा मुलगा आहे का? असे विचारायचे…

व्हॉट्सअॅप ग्रुपबाबत हादरवणारी माहिती- (Nashik TCS Company Crime News)

टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपींकडून मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या मोबाईलमधून व्हॉट्सअॅप ग्रुपबाबत हादरवणारी माहिती समोर आली आहे. दररोज ग्रुप लीडर ग्रुपमधून वेगवेगळे आक्षेपार्ह मॅसेजने तरुणींचे विनयभंग केले जात असल्याची माहिती आली आहे. हिंदू तरुणी आणि महिलांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे मानसिक छळवणूक करण्याचा प्रयत्न सुरु होता. ऑफिसमध्ये दररोज नेटचा पासवर्ड अश्लील नावाने किंवा हिंदू मुलींच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीने सेट केले जात असल्याचे प्रकार समोर आला आहे. शफी शेख आणि रझा मेमन यांच्या मोबाईलमधील काही डेटा डिलीट केल्याचीही शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे तपास यंत्रणेकडून अधिकचा तपास सुरू आहे. तरुणी आणि महिलांचे लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींचा पुन्हा पोलीस ताबा घेऊन प्रकरणातील अधिकचा तपास केला जाणार आहे.

मुख्य आरोपी निदा खान अद्याप फरार – (नाशिक TCS कंपनी क्राईम न्यूज)

कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून निदा खान (Nida Khan) काम बघत होती. आरोपींना दररोज कामाचे नियोजन देण्यासाठी होणाऱ्या मीटिंगमध्ये हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावर धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान ऑपरेशन डिपार्टमेंट म्हणून या सर्व गोष्टी घडवून आणत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. गेल्या 25 दिवसांपासून निदा खान फरार आहे. निदा खानच्या मागावर पोलिसांचे तीन पथक रवाना करण्यात आले आहे. मात्र अद्यापही तिचा ठाऊक ठिकाणा लागत नसल्याचं पाहायला मिळत आहे. कंपनीतील तरुणींना आणि महिलांना मानसिक छळवणूक आणि लैंगिक अत्याचार होताना धर्मांतर करण्याचा मुख्य उद्देश ठेवून अनेक कारनामे या निदा खानच्या सांगण्यावरून घडत होत्या अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. (Nashik TCS Company Crime News)

संबंधित बातमी:

Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर

आणखी वाचा

Comments are closed.