युसूफ पठाणच्या सासऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक, मेहुण्यालाही घेतले ताब्यात; नेमकं प्रकरण काय
युसूफ पठाण फरहेर खटला : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण (Yusuf Pathan) याच्या सासऱ्याला आणि मेहुण्याला मारहाणीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबईतील भायखळा परिसरात शनिवारी रात्री युसूफ खान नावाच्या व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप युसूफ पठाणचे सासरे खालिद खान आणि मेहुणा शोएब खानवर करण्यात आला आहे. (Yusuf Pathan Farher In Law Case)
माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार युसूफ पठाण यांचे सासरे, त्याचा मुलगा आणि आणखी एका नातेवाईकाला दोन दिवसांपूर्वी मुंबईतील भायखळा परिसरात एका व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
— ANI (@ANI) 21 एप्रिल 2026
नेमकं प्रकरण काय? (Yusuf Pathan Farher In Law Case)
सदर प्रकरणातील तक्रारदाराच्या कारने रस्त्यावर साचलेलं पाणी अंगावर उडाल्याने वाद झाला आणि त्याची परिणीती मारहाणीत झाली. कारमुळे अंगावर पाणी उडाल्याने युसूफ खान नावाच्या व्यक्तीला युसुफ पठाणचा मेहूणा शोएब खानकडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करायला जात असलेल्या युसुफ खानला युसुफ पठाणचे सासरे खालिद खान आणि त्यांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याचा आरोप युसुफ खानने केला आहे. यावेळी बांबू आणि बेसबॉल बॅटने मारहाण केल्याचा आरोप आहे. यात त्याचा हात देखील फ्रॅक्चर झाला आहे. भायखळा परिसरात शनिवारी रात्री घटना घडली होती. युसूफ पठाण यांच्या सासऱ्यांसह मेहुणा अशा एकूण तिघांना 2 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Yusuf Pathan Farher In Law Case)
पोलिसांनी काय सांगितलं? (Yusuf Pathan Farher In Law Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ पठाणचा सासरा खालिद खान आणि त्यांचे मुलं उमरशाद आणि शोएब, तसेच आणखी एक आरोपी शाहबाज पठाण यांनी युसूफ खानशी वाद घातला. तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी बेसबॉल बॅट्स आणि बांबूच्या काठ्यांचा वापर करून युसूफ खानला मारहाण केली. पोलिसांनी सांगितले की, शाहबाज खान सध्या फरार आहे, तर उर्वरित तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असून, न्यायालयाने त्यांना २ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली असून, या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात आली आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
ही बातमीही वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.