International News – जर्मनीत गुरुद्वारात दोन गटांत हाणामारी, 11 जण जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जर्मनीतील मोअर्स शहरातील ड्युइसबर्ग परिसरातील एका गुरुद्वारात दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या हाणामारीत किमान 11 जण जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात दोन गटांमध्ये हाणामारी सुरू असल्याचे दिसत आहे. दोन गट चाकू आणि किरपण घेऊन एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहे. ही घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली याबाबत अद्याप कळू शकले नाही.

एऩीटीव्ही इंडियाने जर्मन वृत्तपत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेत 40 जण सहभागी होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपींविरोधात कारवाई केली. आरोपींनी धारदार शस्त्रांव्यतिरिक्त पेपर स्प्रे आणि बंदुकीने एकमेकांवर हल्ले केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

नवीन संचालक मंडळाच्या निवडणुकीवरून हा वाद निर्माण झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वादांमध्ये गुरुद्वाराच्या निधीचाही समावेश आहे, ज्यावर विविध गट आपापसात दावा करत आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.