अंतराळवीरांनी आयफोनने टिपले अद्भुत चित्र

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाची आर्टेमिस-2 मोहीम नुकतीच यशस्वी झाली आहे. अंतराळाच्या दिशेने झेपावलेले चारही अंतराळवीर मोहीम फत्ते करून सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत. परंतु या मोहिमेवेळी या चारपैकी एका अंतराळवीराने चंद्राच्या अगदी जवळून आपल्या आयफोनमध्ये एक असे चित्र टिपले आहे. त्याची आता सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होत आहे.

चंद्राभोवती फिरताना अंतराळवीर रीड वाइसमन यांनी आर्टेमिस कॅप्सूलमधून झूम करून एक अर्थसॅटचा व्हिडीओ शूट केला आहे. हे दृश्य टिपण्यासाठी आयफोनचे 8 एक्स झूम वापरले आहे. हे दृश्य आपल्या डोळ्यांनी जसे दिसत अगदी तसेच आहे. ज्याप्रमाणे आपण पृथ्वीवरून चंद्र बुडताना पाहतो. अगदी तसाच अनुभव या अंतराळवीरांना चंद्राभोवती फिरताना पृथ्वी बुडताना आला. हे दृश्य खूपच खास होते. त्यामुळे हे दृश्य टिपण्याचा मोह अंतराळवीरांना आवरता आला नाही. यावेळी दुसरी अंतराळवीर क्रिस्टीना 400 मिमी लेन्सद्वारे 3 शॉट ब्रेकटमधून सतत फोटो काढत होती. या व्हिडीओत निकॉन कॅमेऱ्याच्या शटरचा आवाजसुद्धा ऐकू येतो.

Comments are closed.