संतापजनक! बाप लेकीच्या नात्याला काळीमा, बापानेच केला दोन्ही मुलींवर अत्याचार, डोंबिवली हादरलं

Dombivli Crime News : बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. बापानेच आपल्या मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन्ही मुलींवर अत्याचार केला असल्याचे तक्रारीत नोंद करण्यात आले आहे. मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

डोंबिवलीत मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाप हा 43 वर्षे वयाचा असून तक्रारदार पिडीता ही 19 वर्षाची आहे. नराधम बाप गेल्या चार वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असून तीच्या लहान बहिणीसोबत देखील त्याने शारीरीक संबंध केल्याचे पिडीतीने तक्रारीत म्हंटले आहे. पिडीतेने मानपाडा पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल करताच नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणमध्ये 9 वर्षाच्या मुलीच्या लैगिंक छळवणूक प्रकरणी कराटे कोचला अटक

कल्याणमध्ये 9 वर्षाच्या मुलीची लैगिंक छळ केल्याच्या प्रकरणी कराटे कोच गिरीष वाघमारे याला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. कराटे कोच वाघमारे हा घरी एकटा होता. त्याने पिडीत 9 वर्षाच्या मुलीला चेस्ट गार्ड दाखवण्याच्या बहाण्याने घरात बोलवले. तिच्या मागून चेस्ट गार्ड लावून तिची लैगिंक छळवणूक केली. हा प्रकार पिडित मुलीने घरी गेल्यावर तिच्या पालकांना सांगितला. पीडित मुलीच्या आईने महात्मा फुले पोलिस ठाण्यात धाव घेतली. पिडीत मुलीसोबत कराटे कोचने लैगिंक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेत कराटे कोच वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकून कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जालना जिल्ह्यात धक्कादायक घटना

जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीवर अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणातील आरोपीचं घर सकाळी जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडालीय, एका अल्पवयीन तरुणीचे अश्लील फोटो काढून तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या आणि तिला धर्मांतरासाठी दबाव टाकणारा आरोपी शेख इम्रान शेख हबीब याला बुधवारी अटक केले होते. रात्री या आरोपीच्या घराला आग लागल्याचे समोर आलं आहे. दरम्यान ही आग कोणी लावली का लागली याचा पोलिस शोध घेत आहे. या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात आकस्मिक आग लागल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.