डोंबिवलीतील 65 इमारतींमधील रहिवाशांना दिलासा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयुक्तांना फोन
डोंबिवली बातम्या: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 65 इमारत रेरा घोटाळा प्रकरणी डोंबिवली आयरेगावातील समर्थ कॉमप्लेक्स (Samarth Complex) इमारतीला महापालिकेने नोटीस बजावली होती. यानंतर स्थानिक नागरिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून या इमारतीतीएल रहिवाशी हवालहृदय झाल्याचे बघायला मिळालं. दरम्यान, या संदर्भात बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर या बातमीची आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. या संदर्भात रात्री उशीरा केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी फोनव्दारे संपर्क साधून इमारतीतील रहिवाशांना कसा दिलासा दिला जाईल यावर चर्चा केलीहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे रात्री उशिरा आयुक्तांच्या बंगल्यावर दाखल होऊन त्यांनी चर्चा केली. अनधिकृत इमारती प्रकरणी अधिवेशनात विषय घेऊन या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी क्लस्टर योजना राबवता येईल का? याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे आमदार मोरे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी केडीएमसी आयुक्तांना फोन केला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना फोन
दरम्याननिवडणुका संपताच कल्याण-डोंबिवलीतील (KDMC) महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवली आयरेगाव येथील समर्थ कॉम्प्लेक्सला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा तोडक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांनी कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिलेले असतानाही नोटीस आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Demolition of Samarth Complex of Dombivli)या संदर्भात बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर या बातमीची आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. या संदर्भात रात्री उशीरा केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनव्दारे संपर्क साधून इमारतीतील रहिवाशांना कसा दिलासा दिला जाईल यावर चर्चा केलीहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकं काय पाऊले उचलले जातात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
Dombivli News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचा शब्द महत्वाचा कि KDMC महत्वाची?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आश्वासन दिलं असताना आता पुन्हा नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचा शब्द महत्वाचा कि KDMC महत्वाची? असा सवालही या ठिकाणच्या स्थानिक महिलांनी विचारला आहे. घरांचे कर्ज सुरू असताना, विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर असताना आणि डोक्यावर या कारवाईची टांगती तलवार असताना या कारवाईच्या नोटीसमुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. कारवाई झाली तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असा आक्रोश समर्थ कॉम्प्लेक्समधील महिलांनी माध्यमांसमोर व्यक्त केला आहे. आम्हाला आमच्या हक्काची रक्कम मिळाल्याला हवी, हक्काचे पैसे, अथवा घर देण्यात यावं, तरच आम्ही पुढचं पाऊल टाकू, असेही स्थानिक महिला म्हणाल्या आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.